Jump to content

माँस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मॉंस या पानावरून पुनर्निर्देशित)
मॉंस
Mons (फ्रेंच)
Bergen (डच) (जर्मन)
वालोनीमधील शहर


ध्वज
चिन्ह
मॉंस is located in बेल्जियम
मॉंस
मॉंस
मॉंसचे बेल्जियममधील स्थान

गुणक: 50°27′0″N 3°57′0″E / 50.45000°N 3.95000°E / 50.45000; 3.95000

देश बेल्जियम ध्वज बेल्जियम
राज्य वालोनी
प्रांत एनो
क्षेत्रफळ १४६.६ चौ. किमी (५६.६ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ९१,७५९
  - घनता ६२६ /चौ. किमी (१,६२० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
www.mons.be


मॉंस (फ्रेंच: Mons; डच: Bergen) ही बेल्जियम देशामधील एनो ह्या प्रांताची राजधानी आहे. हे शहर बेल्जियमच्या नैऋत्य भागात ब्रसेल्सपासून ७० किमी अंतरावर तर फ्रान्सच्या लीलपासून ७५ किमी अंतरावर स्थित आहे.

बेल्जियम व युरोपाच्या इतिहासामध्ये मॉंसला उल्लेखनीय स्थान आहे. पहिल्या शतकात उल्लेखले गेलेले मॉंस बाराव्या शतकादरम्यान भिंती बांधून बंदिस्त करण्यात आले. १२९५ साली मॉंसला एनो प्रदेशाची राजधानी बनवण्यात आले. ८ एप्रिल १६९१ रोजी चौदाव्या लुईने मॉंसवर आक्रमण केले. त्यानंतर अनेक वर्षे मॉंसचा ताबा फ्रान्स, ऑस्ट्रियानेदरलँड्स देशांकडे राहिला. १८१४ साली पहिल्या विल्यमने मॉंसच्या भिंती अधिक बळकट केल्या, परंतु १८३० साली बेल्जियमला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ह्या भिंती पाडून टाकण्यात आल्या.

चेक प्रजासत्ताकातील पेलजाईन ह्या शहरासोबत मॉंसची २०१५ सालामधील युरोपियन सांस्कृतिक राजधानीसाठी निवड झाली आहे.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: