मॅगी जिलेनहाल
| लिंग | महिला |
|---|---|
| नागरिकत्व | अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
| जन्म-नाव | Margalit Ruth Gyllenhaal |
| दिलेले नाव | מרגלית |
| आडनाव | Gyllenhaal |
| टोपणनाव | Maggie Gyllenhaal |
| जन्म तारीख | १६ नोव्हेंबर 1977 |
| जन्मस्थान | मॅनहॅटन |
| वडील | Stephen Gyllenhaal |
| आई | Naomi Foner Gyllenhaal |
| भावंडे | जेक जिलेनहाल |
| वैवाहिक जोडीदार | Peter Sarsgaard |
| अपत्य | Ramona Sarsgaard, Gloria Sarsgaard |
| कुटुंब | Gyllenhaal family |
| बोलण्याची वा लेखनाची भाषा | इंग्लिश भाषा |
| शिक्षण घेतलेली संस्था | कोलंबिया विद्यापीठ, रॉयल अकॅडमी ऑफ ड्रामाटिक आर्ट, Harvard-Westlake School, The Mountain School, The Center for Early Education |
| कार्य कालावधी (प्रारंभ) | 1992 |
| राजकीय पक्षाचा सभासद | डेमोक्रॅटिक पक्ष |
| धर्म | ज्यू धर्म, ख्रिश्चन धर्म |
| सदस्यता | SAG-AFTRA |
| पुरस्कार | गोल्डन ग्लोब पुरस्कार, John Jay Award |
| नामांकने प्राप्त | Academy Award for Best Supporting Actress, Academy Award for Best Writing, Adapted Screenplay |
| Notable role | Lee Holloway |
मार्गालिट रुथ "मॅगी" जिलेनहाल (जन्म १६ नोव्हेंबर १९७७) एक अमेरिकन अभिनेत्री आणि चित्रपट निर्माता आहे.[१] ती स्वीडिश मूळाच्या जिलेनहाल कुटुंबाचा एक भाग आहे. चित्रपट निर्माते स्टीफन जिलेनहाल आणि नाओमी आक्स यांची ती मुलगी आहे आणि अभिनेता जेक जिलेनहाल यांची मोठी बहीण आहे.[२][३][४]
तिने किशोरवयातच तिच्या वडिलांच्या अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकांसह तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि तिच्या भावासोबत डॉनी डार्को (२००१) मध्ये ती दिसली. त्यानंतर ती कन्फेशन्स ऑफ ए डेंजरस माइंड (२००२) आणि मोना लिसा स्माइल (२००३) मध्ये काम केले. कामुक हास्य-नाट्य सेक्रेटरी (२००२) आणि शेरीबेबी (२००६) या तिच्या प्रमुख अभिनयासाठी जिलेनहालला समीक्षकांची प्रशंसा मिळाली, व प्रत्येकाने तिला गोल्डन ग्लोब पुरस्कार नामांकन मिळवून दिले.[५][६] द डार्क नाइट (२००८) या सुपरहिरो चित्रपटात रॅचेल डावेसच्या भूमिकेसाठी तिला व्यापक मान्यता मिळाली.
क्रेझी हार्ट (२००९) मध्ये एकट्या आईच्या तिच्या अभिनयासाठी, तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.[७] २०२१ मध्ये, तिने द लॉस्ट डॉटर या मनोवैज्ञानिक नाटकाद्वारे लेखन आणि दिग्दर्शनात पदार्पण केले, ज्यासाठी तिने व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा सर्वोत्कृष्ट पटकथा पुरस्कार जिंकला आणि सर्वोत्कृष्ट रुपांतरित पटकथेसाठी अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.[८]
ती २००० पासून पाच नाटकांमध्ये दिसली आहे, ज्यात तिचे ब्रॉडवे पदार्पण द रिअल थिंगच्या पुनरुज्जीवनामधुन झाले. तिने अनेक दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम केले आहे, ज्यात बीबीसी राजकीय-थरारपट द ऑनरेबल वुमनचा समावेश आहे. तिच्या अभिनयासाठी, तिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकला आणि प्राइमटाइम एमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.[९] २००९ पासून अभिनेता पीटर सार्सगार्डसोबत तिचे लग्न झाले आहे आणि त्यांना दोन मुली आहेत.[१०][११][१२]
संदर्भ
[संपादन]- ↑ "NLS Other Writings > Say How". National Library Service for the Blind and Physically Handicapped. November 6, 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. March 31, 2011 रोजी पाहिले.
- ↑ Shaitly, Shahesta (July 12, 2014). "Maggie Gyllenhaal: 'I'm claustrophobic, it's taken years to be OK on the subway'". द गार्डियन. October 29, 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. December 6, 2014 रोजी पाहिले.
- ↑ Elissa Golstein (August 8, 2014). "Maggie Gyllenhaal Just Learned Her Real First Name – And It's Super-Jewish". Jewcy. August 11, 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 8, 2014 रोजी पाहिले.
- ↑ Ghert-Zand, Renee (August 8, 2014). "Maggie Gyllenhaal is really Margalit". The Times of Israel. June 24, 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. June 24, 2018 रोजी पाहिले.
- ↑ "HFPA – Awards Search". Golden Globes Official Website. January 14, 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. July 18, 2008 रोजी पाहिले.
- ↑ Hornaday, Ann (March 16, 2007). "For 'SherryBaby,' a Lingering Power". The Washington Post. August 20, 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. September 24, 2008 रोजी पाहिले.
- ↑ Wolf, Jeanne (July 7, 2009). "Maggie Gyllenhaal: All Moms Do 'The Best They Can'". Parade. September 28, 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. February 22, 2022 रोजी पाहिले.
- ↑ Crescenti, Yelena (September 11, 2021). "Festival del Cinema di Venezia 2021: tutti i vincitori". Vogue Italia (Italian भाषेत). September 12, 2021 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ↑ "Maggie Gyllenhaal". Golden Globes. July 7, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 24, 2020 रोजी पाहिले.
- ↑ Hamm, Liza (October 9, 2006). "Gyllenhaal, Sarsgaard Have a Girl". People. September 19, 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. February 22, 2022 रोजी पाहिले.
- ↑ "Happy Birthday Ramona Sarsgaard!". People. October 12, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. October 12, 2019 रोजी पाहिले.
- ↑ "Maggie Gyllenhaal, Peter Sarsgaard Welcome Second Daughter!". Us Weekly. April 30, 2012. October 12, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. October 12, 2019 रोजी पाहिले.