मुसळगाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?मुसळगाव

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर सिन्नर
जिल्हा नाशिक जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

मुसळगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

मुसळगाव च्या पूर्वेस दातली हे गाव असून स्थळ गावच्या दक्षिणेस गोंदे हे गाव आहे मुसळगाव वाचा पश्चिमेस कुंदेवाडी हे गाव आहे गावाच्या उत्तरेस बारागाव पिंपरी हे गाव आहे आणि गुळवंच हे उत्तरेस येते मुसळगाव मधून नाशिक शिर्डी हा हायवे जातो गावातून देवनदी वाहते देव नदी ही कोनांबे येथे उगम पावते आणि कुबेर मनेगाव या मार्गे वाहत मुसळ गावात येते ही नदी पुढे जाऊन गोदावरीस मिळते सांगवी सोमठाणे येथे गोदावरीस मिळते

हवामान[संपादन]

येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४१ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.पर्यंत असते.

लोकजीवन[संपादन]

मुसळगाव मध्ये नदीच्या पलीकडे एमआयडीसी आहे त्यामुळे गावातील बहुतेक लोक आजूबाजूच्या गावातून स्थलांतरित होऊन गावांमध्ये राहतात गावामध्ये शिरसाट आणि शिंदे या आडनावाचे जास्तीत जास्त लोक राहतात दोन गावे आहेत मुसळगाव वरचे मुसळगाव खालचे दोन्ही गावांमध्ये पारंपारिक सण साजरे केले जातात जसे की पोळा हनुमान जयंती महाशिवरात्री आणि सप्ताह बसतो यामध्ये विविध क्षेत्रातील हरिभक्त परायण वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार येऊन आपले कीर्तन सादर करतात गावामध्ये जुने परंपरा अजूनही तशीच आहे

प्रेक्षणीय स्थळे[संपादन]

मुसळगाव मध्ये वरच्या मुसळगाव मध्ये हनुमान मंदिर आणि पार आहे आणि खालच्या मुसळगाव मध्ये मुसळेश्वराचे मंदिर आहे मुसळगाव मध्ये एमआयडीसी ही बघण्यासारखी आहे

नागरी सुविधा[संपादन]

गावामध्ये ग्रामपंचायत आहे आणि रस्ते हे डांबरीकरणाने सुसज्ज असे रस्ते आहे गावामध्ये शाळा आहे आणि गावामध्ये व्यायाम शाळा सुद्धा आहे छोट्या मुलांसाठी खेळण्याची सोय पण केलेली आहे गावातून नदी वाहत असल्यामुळे जुन्या भांड्यासाठी पाणी मुबलक असते गावातून दोन पार्ट वाहतात त्यामुळे शेतीसाठी पाणी मिळते गावाकडे पिण्यासाठी पाणी हे भोजापुर धरण इथून येते किंवा सिन्नर वरून सुद्धा पाणी येते आणि गावोगावी नळा नळाची सोय केलेली आहे

जवळपासची गावे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate