Jump to content

प्रेमचंद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मुन्शी प्रेमचंद या पानावरून पुनर्निर्देशित)
प्रेमचंद
प्रेमचंद
जन्म नाव धनपत राय श्रीवास्तव
टोपणनाव प्रेमचंद
जन्म जुलै ३१, १८८०
लमही, वाराणसी जिल्हा, उत्तर प्रदेश, भारत
मृत्यू ऑक्टोबर ८, १९३६
वाराणसी, उत्तर प्रदेश, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, अध्यापन, पत्रकारिता
भाषा हिंदी
उर्दू
साहित्य प्रकार कथा, कादंबरी
कार्यकाळ आधुनिक
विषय सामाजिक
चळवळ प्रगतिशील लेखक आंदोलन
प्रसिद्ध साहित्यकृती गोदान, गबन
वडील मुन्शी अजायबराय
आई आनंदीदेवी
अपत्ये श्रीपत राय, अमृतराय व कमला देवी
स्वाक्षरी प्रेमचंद ह्यांची स्वाक्षरी

मुन्शी प्रेमचंद (जन्म : वाराणसी, ३१ जुलै १८८० - ८ ऑक्टोबर १९३६) हे हिंदीउर्दू साहित्यातील नावाजलेले लेखक होते. त्यांना उपन्यास सम्राट म्हणून गौरविले जाते. प्रेमचंदांनी इ.स. १९१३ ते इ.स. १९३१ पर्यंत एकूण २२४ कथा, १०० लेख आणि १८ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांची पहिली कादंबरी 'असरारे महाबिद' उर्दू भाषेत होती. ती उर्दू साप्ताहिक 'आवाज-ए-ख़ल्क'मध्ये ८ ऑक्टोबर १९०३पासून क्रमशः प्रसिद्ध झाली, तर त्यांची शेवटची कादंबरी 'मंगलसूत्र' अपुरी राहिली.

जीवन[संपादन]

प्रेमचंद यांनी महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन आपली सरकारी नोकरी सोडली व पहिली कादंबरी हिंदुस्थानवरील ब्रिटिश सत्तेच्या जुलमाची आणि भारतीयांच्या गुलामगिरीवर लिहिली. ती जेव्हा पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली, तेव्हा जप्त झाली. मात्र, देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक होण्यापासून प्रेमचंद वाचले. त्यानंतर त्यांनी आपले नबाब धनपतराय हे नाव बदलून प्रेमचंद घेतले.

इ.स. १९२१पर्यंत प्रेमचंद शिक्षण खात्यात डेप्युटी कलेक्टर म्हणून नोकरी करीत होते, मात्र त्यानंतर ते बनारसला परतले, आणि त्यांनी फक्त देशमुक्तीच्या संघर्षाकरिता आपली लेखणी चालवण्याचे ठरविले. इ.स. १९२३मध्ये त्यांनी 'सरस्वती प्रेस'ची स्थापना केली. प्रेसच्या खर्चासाठी कर्ज मिळविण्याच्या उद्देशाने प्रेमचंद मुंबईला आले व त्यांनी एक चित्रपटकथा लिहून दिली. चित्रपटात त्यांनी मजुराच्या बापाची भूमिकाही केली. मात्र वर्षभरात प्रेमचंद परत गेले. प्रेमचंद हे लेखणीचा शिपाई म्हणून ओळखले जातात.

साहित्य[संपादन]

नाव साहित्यप्रकार भाषा प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अग्नि समाधि कथासंग्रह हिंदी
असरारे मुआबिद कादंबरी उर्दू
अहंकार अनुवाद हिंदी
कर्मभूमि कादंबरी हिंदी वाणी प्रकाशन १९३२
कायाकल्प कादंबरी हिंदी
कुत्ते की कहानी बालसाहित्य हिंदी
कृष्णा कादंबरी हिंदी
गबन कादंबरी हिंदी
गोदान कादंबरी हिंदी १९३६
चांदी की डिबिया अनुवाद हिंदी
जंगल की कहानियॉं बालसाहित्य हिंदी
तालस्ताय की कहानियॉं अनुवाद हिंदी
दुर्गादास बालसाहित्य हिंदी
नमक का दरोगा कथासंग्रह हिंदी
नवजीवन कथासंग्रह हिंदी
नवनिधि कथासंग्रह हिंदी
निर्मला कादंबरी हिंदी मराठी अनुवाद-स्मिता पंडित
न्याय अनुवाद हिंदी
पॉंच फूल कथासंग्रह हिंदी
पिता के पत्र पुत्री के नाम अनुवाद हिंदी
प्रतापचन्द्र कादंबरी हिंदी डायमंड बुक्स, दिल्ली
प्रतिज्ञा कादंबरी हिंदी
प्रेम चतुर्थी कथासंग्रह हिंदी
प्रेम तीर्थ कथासंग्रह हिंदी
प्रेम द्वादशी कथासंग्रह हिंदी
प्रेम पंचमी कथासंग्रह हिंदी
प्रेम पचीसी कथासंग्रह हिंदी
प्रेम पूर्णिमा कथासंग्रह हिंदी
प्रेम प्रतिमा कथासंग्रह हिंदी
प्रेम प्रतिज्ञा कथासंग्रह हिंदी
प्रेम प्रमोद कथासंग्रह हिंदी
प्रेम प्रसून कथासंग्रह हिंदी
प्रेमा कादंबरी हिंदी १९०७
प्रेमाश्रम कादंबरी हिंदी
प्रेरणा कथासंग्रह हिंदी
बैंक का दिवाला कथासंग्रह हिंदी
मंगलसूत्र कादंबरी हिंदी
मनमोदक बालसाहित्य हिंदी
महात्मा शेखसादी चरित्र हिंदी
रंगभूमि कादंबरी हिंदी
रामचर्चा बालसाहित्य हिंदी
वरदान कादंबरी हिंदी
शान्ति कथासंग्रह हिंदी
श्यामा कादंबरी हिंदी डायमंड बुक्स, दिल्ली
सप्तसरोज कथासंग्रह हिंदी
सप्त सुमन कथासंग्रह हिंदी
समर यात्रा कथासंग्रह हिंदी
सुखदास अनुवाद हिंदी
सृष्टि का आरम्भ अनुवाद हिंदी
सेवासदन कादंबरी हिंदी
सोजे-वतन कथासंग्रह उर्दू १९०८
स्वराज के फायदे बालसाहित्य हिंदी
हडताल अनुवाद हिंदी

कार्यक्षेत्र[संपादन]

प्रेमचंद्र आधुनिक हिंदी साहित्याचे पितामह म्हणून ओळखले जातात. १९०१ पासून त्यांच्या साहित्यिक जीवनाचा आरंभ सुरू झाला. पण त्यांची पहिली हिंदी कथा सरस्वती पत्रिकेत डिसेंबरच्या अंकात १९१५ मध्ये 'सौत' या नावाने प्रकाशित झाली. त्यांचा पहिला कथासंग्रह 'सोजे वतन'. देशभक्तीच्या भावनेने ओतप्रोत असल्याने त्यांच्या पुस्तकांवर इंग्रज सरकारने बंदी घातली व अशा प्रकारचे लेखन करू नये म्हणून बजावण्यात आले.

मरणोपरान्त त्यांची कथा मानसरोवर नावाने ८ खंडांमध्ये प्रकाशित झाली. त्यांची शेवटची कथा 'कफन' १९३६मध्ये प्रकाशित झाली. याच्या आधी हिंदीमध्ये काल्पनिक,अय्यारी आणि पौराणिक धार्मिक रचनाच प्रकाशित केली जात होती. प्रेमचंद यांनी हिंदीमध्ये यथार्थवादाची सुरुवात केली. भारतीय साहित्याचा बराचसा विमर्श नंतर समोर आला. दलित साहित्य आणि नारी साहित्याची खोलवर मुळे प्रेमचंदांच्या साहित्यात दिसली. प्रेमचंदांचा लेख 'पहली रचना' आपल्या मामांवर लिहिलेला व्‍यंगलेख होता, मात्र हा आता अनुपलब्‍ध आहे. त्यांचा पहिली उपलब्‍ध कादंबरी उर्दू उपन्यास 'असरारे हमसवाब' होय. याचे हिंदीत रूपांतर प्रेमा नावाने १९०७ साली प्रकाशित झाले .प्रेमचंदांची दुसरी कादंबरी 'हमखुर्मा व हमसवाब' पण प्रकाशित झाली. यानंतर प्रेमचंदांचा पहिला कथासंग्रह सोज़े-वतन नावाने आला. तो १९०८मध्ये प्रकाशित झाला. देशभक्तीच्या भावनांनी ओतप्रोत असल्याने यावर इंग्रज़ी शासनाने बंदी घातली, आणि भविष्‍यात अशा प्रकारचे लेखन न करण्याचे निर्देश दिले. या कारणांनी त्यांना नाव बदलून लेखन करावे लागले. 'प्रेमचंद' या नावाने त्यांची पहिली कथा 'बड़े घर की बेटी 'ज़माना पत्रिका'मध्ये डिसेंबर १९१० च्या अंकात प्रकाशित झाली. कथा सम्राट प्रेमचंदांचे म्हणणे होते की साहित्यकार देशभक्ति आणि राजनीतीच्या मागे जाणारी सच्चाई नाही तर त्याच्या पुढे मशाल दाखवत चालणारी सच्चाई आहे. हे सत्य त्यांच्या साहित्यातून दिसून येते. १९२१मध्ये त्यांनी महात्मा गांधींच्या आवाहनानुसार आपली नोकरी सोडून दिली आणि काही महिने 'मर्यादा पत्रिकाचा संपादनभार सांभाळला. सहा वर्षापर्यंत 'माधुरी' या पत्रिकेचे संपादन केले. १९३०मध्ये बनारस येथून आपले मासिक पत्र 'हंस' सुरू केले आणि १९३२ च्या सुमारास जागरण नावाने एक साप्ताहिक अजून काढले. त्यांनी लखनौमध्ये १९३६ साली झालेल्या अखिल भारतीय प्रगतिशील लेखक संघ संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी मोहन दयाराम भवनानींच्या अजंता सिनेटोन कंपनीमध्ये कथालेखक म्हणून नोकरीपण केली. १९३४मध्ये प्रदर्शित मजदूर या फिल्मची कथा लिहिली आणि कॉन्ट्रॅक्ट केलेल्या वर्षभराचा कालावधी पूर्ण करण्याआधीच दोन महिन्‍याचा पगार सोडून ते बनारस येथे पळून गेले. त्यांनी मूळरूपाने हिंदीमध्ये १९१५ पासून कथा लिहिल्या आणि १९१८ च्या 'सेवासदन'पासून कादंबऱ्या लिहायला सुरुवात केली

प्रेमचंदांनी लिहिलेल्या कादंबऱ्या[संपादन]

 • प्रेमचंदांची पहिली कादंबरी उर्दूत ‘असरारे मआबिद (अपूर्ण) ऊर्फ 'देवस्थान रहस्य’ उर्दू साप्ताहिक ‘'आवाज-ए-खल्क़'’मध्ये ८ ऑक्टोबर १९०३ ते १ फेब्रुवारी १९०५ पर्यंत धारावाहिक रूपाने प्रकाशित झाली.
 • कर्मभूमि (१९३२* कायाकल्प (१९२७)
 • गोदान
 • निर्मला (१९२५)
 • प्रेमाश्रम (१९२२)- ही शेतकरी जीवनावरचा त्यांची पहिली कादंबरी आहे. हिचासुद्धा पहिला मसूदा उर्दूमध्ये 'गोशाए-आफियत' नावाने तयार झाला होता; पण ती पहिल्यांदा हिंदीत प्रकाशित झाली. ही कादंबरी अवधच्या शेतकरी आंदोलनादरम्यान लिहिली गेली.
 • बन (१९२८)
 • रंगभूमि (१९२५)- हिच्यात प्रेमचंदांनी एका आंधळ्या भिकाऱ्याला-सूरदासला कथानायक बनवून हिंदी कथा साहित्‍यामध्ये क्रांतिकारी बदल केला.
 • सेवासदन (१९१८)- ही कादंबरी मूळरूपात 'बाजारे-हुस्‍न' नावाने उर्दूमध्ये लिहिली होती, नंतर हिचे हिंदी रूप 'सेवासदन' प्रकाशित झाले ही एका स्त्रीच्या वेश्‍या बनण्याची कथा आहे. डॉ रामविलास शर्मा यांच्या मते 'सेवासदन'मध्ये भारतीय नारीची पराधीनता हीच मुख्‍य समस्‍या मांडली आहे..
 • त्यांची दुसरी कादंबरी 'हमखुर्मा व हमसवाब'. हिचे हिंदी रूपांतरण 'प्रेमा' नावाने १९०७ मध्ये प्रकाशित झाले. प्रेमचंद हे मुळात उर्दू लेखक होते आणि उर्दू भाषेतून हिंदीमध्ये आले होते, म्हणून त्यांच्या सुरुवातीच्या कादंबऱ्या उर्दूमध्ये आहेत, नंतर त्याचे हिंदीमध्ये भाषांतर झाले.

कथा[संपादन]

प्रेमचंदांच्या अनेक कथांमध्ये निम्न व मध्यम वर्गांचे चित्रण आहे. डॉ॰ कमलकिशोर गोयंकाने प्रेमचंदांच्या सर्व हिंदी-उर्दू कथांना 'प्रेमचंद कथा रचनावली' नावाने प्रकाशित केले आहे. त्यांच्यानुसार प्रेमचंदांनी एकूण ३०१ कथा लिहिल्या, पैकी ३ अप्राप्य आहेत. प्रेमचंदांचा पहिला कथासंग्रह सोज़े वतन'नावाने जून १९०८मध्ये प्रकाशित झाला. याच संग्रहातली पहिली कथा 'जगातील सर्वात अनमोल रत्न'ला त्यांची पहिली प्रकाशित कथा मानले गेले. डॉ॰ गोयंकांच्या मते कानपूरहून निघालेल्या उर्दू मासिक पत्रिका 'ज़माना'च्या एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध झालेली 'सांसारिक प्रेम और देश-प्रेम(इश्के दुनिया आणि हुब्बे वतन) वास्तवात त्यांची पहिली प्रकाशित कथा आहे.

प्रेमचंदांच्या प्रमुख कथा[संपादन]

 • 'ईदगाह'
 • 'गुल्‍ली डंडा'
 • 'ठाकुर का कुऑं'
 • 'तावान'
 • 'दूध का दाम'
 • 'दो बैलों की कथा'
 • 'पंच परमेश्‍वर'
 • 'पूस की रात'
 • 'बड़े भाई साहब'
 • 'बूढ़ी काकी'
 • 'मंत्र'
 • 'विध्‍वंस'
 • 'सद्गति'

कथासंग्रह[संपादन]

 • 'नवनिधि'
 • प्रेमचंदजींची लोकप्रिय कथा
 • 'प्रेम-द्वादशी'
 • 'प्रेम-पचीसी'
 • 'प्रेमपूर्णिमा'
 • प्रेम-प्रतिमा'
 • 'मानसरोवर' : भाग एक व दोन आणि 'कफन' त्यांच्या मृत्‍यूनंतर 'मानसरोवर'या संग्रहात ८ भागांत प्रकाशित झाल्या.
 • 'सप्‍त सरोज'
 • 'समरयात्रा'

नाटके[संपादन]

 • कर्बला (१९२४)
 • प्रेम की वेदी (१९३३) : हे नाटक शिल्‍पण आणि संवेदनाच्या स्‍तरावर चांगले आहे. परंतु त्यांच्या कथांनी आणि कादंबऱ्यांनी एवढी उंची गाठली होती की नाटकाच्या क्षेत्रात प्रेमचंद यांना विशेष यश मिळाले नाही.
 • संग्राम (१९२३)

लेख/निबंध[संपादन]

 • उपन्‍यास
 • कहानी कला (तीन भाग)
 • कुछ विचार
 • जीवन में साहित्‍य का स्‍थान
 • पुराना जमाना नया जमाना
 • अमृतराय द्वारा संपादित 'प्रेमचंद : विविध प्रसंग' (तीन भाग). वास्‍तविक पाहता हे प्रेमचंदांच्या लेखांचे संकलन आहे. प्रेमचंदा़चे लेख 'कुछ विचार' या शीर्षकाखालीही छापले आहेत.
 • महाजनी सभ्‍यता
 • वराज के फायदे
 • साहित्‍य का उद्देश्‍य
 • हिंदी-उर्दू की एकता

अनुवाद[संपादन]

प्रेमचंद एक यशस्वी अनुवादकपण होते. दुसऱ्या भाषांच्या ज्या लेखकांनी त्यांना प्रभावित केले त्यांच्या कृतींचा त्यांनी अनुवादपण केला. टॉलस्‍टॉयच्या कथा (१९२३), गाल्‍सवर्दीच्या हड़ताल (१९३०), चॉंदी की डिबिया (१९३१) आणि न्‍याय (१९३१) या नावांनी अनुवाद केले. त्यांनी रतननाथ सरशार यांची उर्दू कादंबरी 'फसान-ए-आजाद'चा हिंदी अनुवाद 'आजाद' नावाने केला. हा अनुवाद खूप गाजला.

चरित्रे[संपादन]

प्रेमचंद यांच्या पत्नी शिवरानी देवी यांनी प्रेमचंदांवर लिहिले आणि ज्यापासून लोक अनभिज्ञ होते त्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला उजाळा दिला. ही पुस्तके १९४४मध्ये प्रकाशित झाली होती. साहित्याच्या क्षेत्रात याचे महत्त्व जाणून हे चरित्र पुन्हा २००५मध्ये संशोधित करून प्रकाशित झाले. हे काम त्यांचेच नातू प्रबोध कुमार याने पूर्ण केले. तसेच त्याचे इंग्रजी व हसन मंज़रने केलेले उर्दू अनुवाद पण प्रकाशित झाले. त्यांच्या मुलगा अमृत राय याने 'कलम का सिपाही' नावाने वडिलांचा जीवन प्रवास लिहिला.

विविध[संपादन]

 • मुख्य लेख : प्रेमचंद की रचनाएॅं
 • बाल साहित्य : रामकथा, कुत्ते की कहानी
 • विचार : प्रेमचंद : विविध प्रसंग, प्रेमचंद के विचार (तीन खंडांत)
 • संपादन : मर्यादा, माधुरी, हंस, जागरण

समीक्षणे[संपादन]

 • मुख्य लेख : प्रेमचंदच्या साहित्याची वैशिष्ट्ये
 • प्रेमचंद उर्दूचे संस्कार घेऊन हिंदीमध्ये आले होते आणि हिंदीचे महान लेखक बनले. हिंदीला त्यांनी आपला खास मुहावरा आणि मोकळपणा दिला. कथा आणि उपन्यास दोन्ही मध्ये युगान्तरकारी परिवर्तन केले. त्यांनी साहित्यात सामयिकता प्रकर्षाने स्थापित केली. सामान्य माणसाला त्यांनी आपल्या लेखांचे विषय बनवले आणि त्यांच्या समस्यांवर ते निर्भयपणे लिहीत गेले. त्यांना साहित्याच्या नायकपदावर बसवले. प्रेमचंदच्या आधी हिंदी साहित्य राजा-रानीच्या गोष्टी, रहस्य-रोमांच मध्येच गुंतवून राहिले होते. प्रेमचंदांनी साहित्याला खरेपणा दिला. त्यांनी जीवनाच्या आणि कालखंडाच्या खरेपणाला कागदावर आणले. ते सांप्रदायिकता, भ्रष्टाचार, ज़मीनदारी, कर्ज़खोरी, ग़रिबी, उपनिवेशवाद यांवर आजीवन लिहीत राहिले. प्रेमचंदांच्या लेखांत त्यांच्याच ग़रिबी आणि दैन्याच्या कथा आहेत. ते एक सामान्य जनतेचे रचनाकार होते. त्यांच्या लेखांत असे नायक असायचे की ज्यांना भारतीय समाजाने अछूत आणि घृणित समजले होते. त्यांनी सरळ, सहज आणि सामान्य बोली भाषेचा वापर केला आणि आपल्या प्रगतिशील विचारांना ठामपणाचा तर्क देत ते समाजापुढे मांडत गेले. १९३६मध्ये प्रगतिशील लेखक संघांचे पहिल्या संमेलनाच्या अध्यक्षपदी करताना ते म्हणाले की 'लेखक स्वभावाने प्रगतिशील असतो, जो असा नसेल तर तो लेखक नाही'. प्रेमचंद हिंदी साहित्याचे युगप्रवर्तक आहेत. त्यांनी हिंदी कथांमध्ये आदर्शोन्मुख यथार्थवादाची एक नवीन परंपरा सुरू केली.

प्रेमचंदांवरील आरोप[संपादन]

प्रेमचंद महान रचनाकार असूनही प्रेमचंद यांचे जीवन आरोपापासून मुक्‍त नाही. प्रेमचंदांचे अभ्यासक कमलकिशोर गोयंकानी आपल्या पुस्‍तकात 'प्रेमचंद : अध्‍ययन की नई दिशाएं' मध्ये प्रेमचंद यांच्यावर काही आरोप लावून त्यांच्या साहित्‍याचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न केले. प्रेमचंदांवर लावलेल्या मुख्‍य आरोपांत असे म्हटले आहे की- प्रेमचंदांनी आपल्या पहिली पत्‍नीला विनाकारण सोडले आणि दुसऱ्या विवाहानंतरही त्यांचे तिसऱ्या महिलेबरोबर संबंध होते. हेच शिवरानी देवीने 'प्रेमचंद घर में' या पुस्तकात लिहिले आहे. प्रेमचंदांनी 'जागरण विवाद'मध्ये विनोदशंकर व्‍यासला धोका दिला. प्रेमचंदांनी आपल्या प्रेसचे वरिष्‍ठ कर्मचारी प्रवासीलाल वर्मा यांची फसवणूक केली. त्यासाठी प्रेमचंदांच्या कामगारांनी संप केला होता. प्रेमचंदांनी आपल्या मुलीच्या आजारपणात बुवाबाजी, अंधश्रद्धेचा आधार घेतला. कमलकिशोर गोयंकांनी लावलेले हे आरोप प्रेमचंदांच्या जीवनाचा एक हिस्सा म्हणून जरूर आपल्या समोर येतात. यात त्यांची मानवीय कमजोरी दिसते, परंतु त्यांच्या व्‍यापक साहित्‍याच्या मूल्‍यांकनावर या आरोपांचा काहीही परिणाम झाला नाही. प्रेमचंदांना लोक आज त्यांच्या कामामुळे खूप मान देतात.

प्रेमचंदांना मुन्शी प्रेमचंद का म्हणतात?[संपादन]

प्रेमचंदांना "मुन्शी प्रेमचंद" या नावाने ओळखले जाते. प्रेमचंदांच्या नावाला 'मुंन्शी' कधी आणि केव्हा चिकटले ? या विषयावर बहुतेक लोक हेच मानतीत की सुरुवातीला प्रेमचंद अध्यापक होते अध्यापकांना त्या वेळी मुन्शी म्हटले जाई. शिवाय कायस्थांच्या नावापुढे सन्मानस्वरूपी 'मुन्शी' शब्द लावण्याची परंपरा होती म्हणून प्रेमचंदांच्या नावाआधी मुन्शी शब्द रूढ झाला.. प्रोफेसर शुकदेव सिंहांच्या मते प्रेमचंदांनी आपल्या नावाआधी 'मुन्शी' शब्दाचा प्रयोग स्वतः कधी केला नाही. प्रेमचंदांच्या प्रशंसकांनी 'मुन्शी' कधी लावले हे केवळ तर्काने जाणून घेता येते .प्रेमचंदांच्या नावाआधी मुन्शी हे विशेषण जोडण्याचे प्रामाणिक कारण हे आहे की 'हंस' नामक पत्रिका प्रेमचंद आणि 'कन्हैयालाल मुन्शी' यांच्या सहसंपादनामध्ये निघत असे. त्याच्या काही प्रतींवर कन्हैयालाल मुन्शींचे पूर्ण नाव न छापता फक्त 'मुन्शी' छापलेले असायचे. त्यामुळे प्रेमचंदांच्या नावालाही मुन्शी चिकटले. (हे हंसच्या प्रतीवर पाहता येते.

आता मुन्शी प्रेमचंद नाही म्हटले तर ते नाव अपूर्ण वाटते.

वारसा[संपादन]

प्रेमचंदांनी आपल्या कलेचे शिखर गाठण्यासाठी अनेक प्रयोग केले. ज्या युगामध्ये प्रेमचंदांनी लेखणी उचलली होती त्या काळी त्यांच्यापूर्वी अशी कोणताच ठोस वारसा नव्हता, तसेच नाही विचार आणि प्रगतिशीलतेचे कोणतेच मॉडल त्यांच्या समोर नव्हते. परंतु काम करता करता त्यांनी गोदान सारख्या कालजयी कादंबरीची रचना केली आणि ते एक आधुनिक क्लासिक मानले जाते. त्यांनी वस्तू बनवली आणि स्वतःला आकार दिला. जेव्हा भारताचे स्वातंत्र्य आंदोलन चालू होते तेव्हा त्यांनी कथा साहित्याद्वारे हिंदी आणि उर्दू दोन्ही भाषांमध्ये अभिव्यक्ति दिली. त्यांनी सियासी सरगर्मीला, जोशला आणि आंदोलनाला सगळ्यांपुढे मांडले, आणि ताक़तवर बनविले. त्यामुळे त्यांचे लेखन पण ताक़तवर झाले. प्रेमचंद या अर्थाने निश्चितच हिंदीचे पहिले प्रगतिशील लेखक असतील. १९३६मध्ये त्यांनी प्रगतिशील लेखक संघाच्या पहिल्या संमेलनाला अध्यक्ष म्हणून संबोधिले. त्यांचे हेच भाषण प्रगतिशील आंदोलनाच्या घोषणापत्राचा आधार बनले. प्रेमचंदांनी हिंदीत कथांच्या एका परंपरेला जन्म दिला आणि एक पूर्ण पिढ़ी त्यांच्या पावलांवर पाऊल टाकत गेली. १९५०-६० च्या दशकात रेणु ,नागार्जुन व या नंतर श्रीनाथ सिंह यांनी ग्रामीण जीवनावर ज्या कथा लिहिल्या त्या एक प्रकारे प्रेमचंदांच्या परंपरेच्या कक्षामध्ये येतात. प्रेमचंद एक क्रांतिकारी रचनाकार होते. त्यांनी फक्त देशभक्तीवरच लिहिले नाही तर, त्याच बरोबर समाजाला ग्रासलेल्या अनेक वाईट परंपरा पाहिल्या आणि त्या कथाच्या रूपात लोकांसमोर ठेवल्या. त्यांनी त्या वेळच्या समाजापुढे ज्या समस्या होत्या, त्या सर्वंचे चित्रण करण्याची सुरुवात केली. त्यात दलित पण येतात, नारी पण येते. हे सर्व विषय पुढे जाऊन हिंदी साहित्याचे विमर्श बनले. प्रेमचंद हिंदी सिनेमाच्या सर्वात अधिक लोकप्रिय चित्रपट कथालेखकांपैकी एक आहेत. सत्यजित रायने त्यांच्या दोन कथांवर अविस्मरणीय चित्रपट बनवले. १९७७ मध्ये शतरंज के खिलाड़ी आणि १९८१ मध्ये सद्गती. त्यांच्या निधनानंतर दोन वर्षांत सुब्रमण्यमने १९३८मध्ये सेवासदन कादंबरीवरर फ़िल्म बनविली, जिच्यामध्ये सुब्बालक्ष्मीने मुख्य भूमिका बजावली होती. १९७७ मध्ये मृणाल सेनने प्रेमचंदांची कथा-कफ़न वर आधारित 'ओका ऊरी कथा' नावाने एक तेलुगू फ़िल्म बनविली. तिला सर्वश्रेष्ठ तेलुगू फ़िल्म राष्ट्रीय पुरस्कारपण मिळाला. १९८०मध्ये त्यांच्या कादंबरीवर बनलेली टीव्ही मालिका 'निर्मला' हीही खूप लोकप्रिय झाली.

प्रेमचंदांसंबंधी नवीन अध्‍ययन[संपादन]

हिंदी साहित्‍य आणि समीक्षण यांद्वारे प्रेमचंदांना प्रतिष्ठित करण्याचे श्रेय डॉ. रामविलास शर्मा यांना दिले जाते. पण ही एक चुकीची धारणा आहे. खरेतर कथाकार आणि कादंबरीकाराच्या रूपात प्रेमचंदांची लोकप्रियता त्यांच्या जीवनकाळातच इतकी जास्त होती की त्यांना पहिल्यापासूनच 'उपन्यास सम्राट' म्हटले जात होते. प्रेमचंदला स्थापित करणारे त्यांचे वाचक होते, आलोचक नाही. प्रेमचंदांच्या पत्रांना सांभाळून ठेवण्याचे काम अमृतराय आणि मदनगोपाल यांनी केले. प्रेमचंदावर झालेल्या अध्‍ययनामध्ये कमलकिशोर गोयंका आणि डॉ॰ धर्मवीरांचे नाव उल्‍लेखनीय आहे. कमलकिशोर गोयंकाने प्रेमचंदांच्या जीवनाच्या कमजोर भागाला उजागर करण्याबरोबर प्रेमचंद का अप्राप्‍य साहित्‍य (दो भाग) व 'प्रेमचंद विश्‍वकोश' (दो भाग) का संपादन पण केले. डॉ॰ धर्मवीर ने दलित दृष्टीने प्रेमचंदांच्या साहित्‍याचे मूल्यांकन करत प्रेमचंद : सामंत का मुन्शी व प्रेमचंद की नीली ऑंखें नावाने पुस्‍तकें लिहिली.

पुरस्कार व सन्मान[संपादन]

प्रेमचंदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भारतीय डाकतार विभागातर्फे ३० जुलै १९८०ला त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने ३० पैसे मूल्याचे एक डाक तिकीट काढले होते. गोरखपुरच्या ज्या शाळेत ते शिक्षक होते तेथे प्रेमचंद साहित्य संस्थेची स्थापना केली आहे. प्रेमचंदच्या १२५ व्या जन्मदिवसाच्या निमित्ताने शासनातर्फे घोषणा केली गेली की वाराणसीजवळच्या त्या गावात प्रेमचंदांचे एक स्मारक आणि शोध आणि अध्ययन संस्था बनवावी..

संदर्भ[संपादन]

सहायक पुस्तके :

 • रामविलास गोपाल मदन (२००२), प्रेमचंद की आत्मकथा, प्रभात प्रकाशन (नवी दिल्ली) आई॰एस॰बी॰एन॰ 8173153140।
 • अमृतराय (१९९०), कलम का सिपाही, साहित्य अकादमी (दिल्ली), आई॰एस॰बी॰ऍन॰ 8172010141।
 • प्रेमचंद (२००३), प्रेमचंद की ७५ लोकप्रिय कहानियॉं, राजा प्रकाशन (दिल्ली), आई॰एस॰बी॰एन॰ 8176046663।
 • शिवरानी देवी (२००६), प्रेमचंद घर में, आत्माराम ॲन्ड सन्स (दिल्ली).