Jump to content

मुक्ती बाहिनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मुक्ती फौज या पानावरून पुनर्निर्देशित)

मुक्ती वाहिनी (किंवा बांगला मुक्तिवाहिनी) ही १९७१च्या बांगलादेशाच्या स्वातंत्र्ययुद्धात पाकिस्तानी लष्कराविरुद्ध गनिमी युद्ध लढणारी संघटना होती.

१९६९ पासूनच बांगलादेशात, (तत्कालीन पूर्व पाकिस्तान) असंतोषाची बीजे मूळ धरू लागली होती. अयूब खानांविषयी असंतोष भडकत होता. मुजिबुर रेहमान हे आपल्या सहा कलमी कार्यक्रमाद्वारे या सगळ्याला धार आणत होते. बांगलादेश पाकिस्तान पासून स्वतंत्रच व्हावा या मागणीने मूळ धरले. या सगळ्याला चिरडण्यासाठी पश्चिम पाकिस्तानातून दले आणण्यात आली. या मोहिमेचे नाव होते 'ऑपरेशन सर्च लाईट'. या अवाजवी पणे राबवलेल्या मोहिमेमुळे यादवी युद्धालाच सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणात निर्वासित भारताच्या पूर्व सीमेवर येऊ लागले. या सगळ्याशी मुकाबला करण्यासाठी भारताने मुक्ती वाहिनीला पाठिंबा व मदत करणे सुरू केले. हीच वाहिनी किंवा याचे काही भाग मुक्ती फौज नावानेही ओळखली जात होते. यात मुख्यतः विद्यार्थ्यांचा भरणा होता. बांगलादेशाच्या काही भागात या वाहिनीने पाकिस्तानी सैन्याचा विस्कळीत असा प्रतिकार केला. भारतीय सैन्याच्या आधाराने या वाहिनीने बांगलादेशाचे स्वातंत्र्य मिळवले.

बांगला मुक्ती वाहिनी हीच वाहिनी किंवा याचे काही भाग मुक्ती फौज नावानेही ओळखली जात होते. यात मुख्यतः विद्यार्थ्यांचा भरणा होता. बांगला देशाच्या काही भागात या वाहीनीने पाकिस्तानी सैन्याचा विस्कळीत असा प्रतिकार केला. भारतीय सैन्याच्या आधाराने या वाहीनीने पुर्व पाकिस्तान आताचाबांगलादेशचे पाकिस्तान पासून स्वातंत्र्य मिळवले.पूर्व पाकिस्तान हा बांगलादेश नावाने जन्मास आला.