मिखाइल साकाश्विली
मिखाइल साकाश्विली | |
![]()
| |
जॉर्जियाचा राष्ट्राध्यक्ष
| |
कार्यकाळ २० जानेवारी २००८ – १७ नोव्हेंबर २०१३ | |
मागील | एदुआर्द शेवार्दनात्झे |
---|---|
पुढील | जियॉर्जी मार्गवेलाश्विली |
कार्यकाळ २५ जानेवारी २००४ – २५ नोव्हेंबर २००७ | |
जन्म | २१ डिसेंबर, १९६७ त्बिलिसी, जॉर्जियन सोसाग, सोव्हियेत संघ |
सही | ![]() |
मिखाइल साकाश्विली (जॉर्जियन: მიხეილ სააკაშვილი; जन्म: २१ डिसेंबर १९६७) हा कॉकेशसमधील जॉर्जिया देशाचा तिसरा राष्ट्राध्यक्ष आहे. २००३ सालच्या रक्तहीन क्रांतीनंतर सत्तेवर आलेल्या साकाश्विलीने जॉर्जियामध्ये अनेक आर्थिक सुधारणा घडवून आणल्या. त्याने नाटो व पश्चिम जगतासोबत जॉर्जियाचे संबंध बळकट केले. सध्या जॉर्जियामधील ६७ टक्के लोकांनी साकाश्विलीला पसंदी दाखवली आहे. २ वेळा राष्ट्राध्यक्षपदावर राहिल्यानंतर साकाश्विली ऑक्टोबर २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी अपात्र ठरला. ह्या निवडणुकीमध्ये विजय मिळवुन जियॉर्जी मार्गवेलाश्विली जॉर्जियाचा नवा राष्ट्राध्यक्ष निवडून आला आहे.
साकाश्विलीच्या कारकिर्दीत जॉर्जियाचे रशियासोबतचे संबंध रसातळाला पोचले. जॉर्जियामधील दक्षिण ओसेशिया व अबखाझिया ह्या फुटीरवादी प्रदेशांना रशियाने दिलेला पाठिंबा हे त्याचे मुख्य कारण मानले जाते.