मालिश खुर्ची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पारंपारिक मालिश खुर्ची

मालिश खुर्ची मालिश करतना मदत व्हावी अशा प्रकारची खुर्ची असते. या मध्ये दोन प्रकारच्या उत्पादनांचा संदर्भ आहे. पारंपारिक मालिश खुर्च्या मालिश थेरपिस्टला मालिश प्राप्तकर्त्याच्या डोक्यावर, खांद्यावर आणि पाठीवर सहजपणे पोहचण्यास मदत करते. तर रोबोटिक मालिश खुर्च्या इलेक्ट्रॉनिक व्हायब्रेटर आणि मोटर्सद्वारे मालिश करतात.[१][२]

इतिहास[संपादन]

पहिली मालिश खुर्ची १९५४ मध्ये नोबो फुजीमोटो यांनी ओसाका, जपानमध्ये डिझाइन केली होती. त्यांनी पुर्ण खुर्ची बनवण्यापूर्वी स्क्रॅप मटेरियलपासून खुर्चीच्या विविध आवृत्त्या बनवल्या होत्या.[३]

प्रकार[संपादन]

पारंपारिक[संपादन]

एक पारंपारिक मालिश खुर्ची

खुर्चीवरच्या मालिशसाठी एक एर्गोनोमिकली पोर्टेबल खुर्ची वापरली जाते.[४] खुर्चीवरच्या मालिशमध्ये डोके, मान, खांदा, हाताच्या मागचा भाग आणि हातावर लक्ष केंद्रित केले जाते . मालिश थेरपिस्ट अनेक वातावरणात मालिश करण्यास सक्षम असताता. यासाठी मालिश खुर्चीची पोर्टेबिलिटीची गरज असते. ग्राहकांना खुर्चीवर मालिश करण्यासाठी कपडे काढण्याची आवश्यकता नसते. या दोन कारणांमुळे, चेअर (खुर्चीवरचे) मालिश अनेकदा व्यवसायिक कार्यालये, कर्मचाऱ्यांसाठीचे कौतुक कार्यक्रम, व्यापार मेळावे, परिषद आणि इतर कॉर्पोरेट सेटिंग्ज यासारख्या कार्यक्रमांमध्ये केले जाते.

रोबोटिक[संपादन]

रोबोटिक मालिश चेअर

रोबोटिक मालिश खुर्चीमध्ये अंतर्गत इलेक्ट्रॉनिक मोटर्स आणि गियर असतात जे त्यामध्ये बसलेल्या व्यक्तीला मालिश करण्यासाठी डिझाइन केलेले असतात. बहुतेक रोबोटिक मालिश खुर्च्यांमध्ये मालिश करण्याचा प्रकार, स्थान किंवा तीव्रता बदलण्यासाठी काही प्रकारचे नियंत्रक असतात. पहिल्या इलेक्ट्रिक मालिश खुर्चीचा शोध जपानमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्याआधी लावला होता.[५]

मालिश खुर्च्या रीक्लायनर्ससारख्या (आरामखुर्ची) दिसतात. यात अनेक प्रकार आणि ब्रँड आहेत. ज्यात कार्यालय-शैलीतील खुर्च्याही आहेत ज्या अंतर्गत बॅटरी वापरून कार्य करतात. परंतु मालिश खुर्च्या महाग असतात. कमी खर्चाचा पर्याय म्हणजे स्वतंत्र मालिश पॅड घेऊन विद्यमान खुर्चीवर टाकून वापरला जाऊ शकतो.

मालिश खुर्चीचे बरेच फायदे आहेत, उदा: शांत विश्रांती, रक्तदाब कमी करणे, नाडीचा दर कमी करणे आणि चयापचय वाढणे.

मालिश खुर्च्या मालिश थेरपिस्टच्या हाताच्या हालचालींचे अनुकरण करण्यासाठी डिझाइन केलेल्या असतात. ते शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर मालिश करण्यासाठी मालिश रोलर्स आणि एअरबॅगचे संयोजन वापरतात.

रोबोटिक मालिश खुर्च्या प्रथम १९५४ मध्ये फॅमिली फुजीरियोकी कंपनीने बाजारात आणल्या होत्या. आज जपान देश हा मालिश खुर्च्यांचा सर्वात मोठा ग्राहक आहे. काही सर्वेक्षणानुसार जपानी कुटुंबांपैकी २०% पेक्षा जास्त कुटुंबांकडे स्वतःची मालिश खुर्ची आहे.[६]

मालिश खुर्च्या किंमत, शैली आणि तीव्रतेमध्ये विविध प्रमाणात बदलतात. त्या स्वस्त म्हणजे "केवळ कंपित" खुर्ची पासून खुप साऱ्या सुविधा असणारे शियात्सु मॉडेल पर्यंत असु शकते.[७]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Pritchard, Darien (2007). Dynamic bodyuse for effective strain-free massage. Chichester, England: North Atlantic Books. p. 16. ISBN 978-1556436550. 24 February 2017 रोजी पाहिले.
  2. ^ Zullino, Daniele F.; Krenz, Sonia; Frésard, Emmanuelle; Cancela, Enrico; Khazaal, Yasser (2005-12-01). "Local Back Massage with an Automated Massage Chair: General Muscle and Psychophysiologic Relaxing Properties". The Journal of Alternative and Complementary Medicine. 11 (6): 1103–1106. doi:10.1089/acm.2005.11.1103. ISSN 1075-5535. PMID 16398603.[permanent dead link]
  3. ^ "History of Massage Chairs". www.fujiiryoki.com. 2017-04-06 रोजी पाहिले.
  4. ^ Hanlon, hyllis. "Have a Seat: Chair Massage for Pregnant Clients". Massage Magazine. 8 May 2015 रोजी पाहिले.
  5. ^ "Notice". ajw.asahi.com. Archived from the original on March 3, 2016. 2 July 2016 रोजी पाहिले.
  6. ^ "Notice". www.nippon.com. 10 Oct 2018 रोजी पाहिले.
  7. ^ Anderson, Patricia M. Holland, Sandra K. (2011). Chair massage (2nd ed.). St. Louis, Mo.: Mosby Elsevier. p. 52. ISBN 978-0323025591. 2 July 2016 रोजी पाहिले.