मार्क्सवादी इतिहासलेखन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कार्ल मार्क्सच्या विचारांवर आधारित जे इतिहासलेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहासलेखन असे म्हणतात. मार्क्सवादी इतिहासलेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो, याचे विश्लेषण करणे, हे मार्क्सवादी इतिहासलेखनाचे मुख्य सूत्र आहे. मार्क्सवादात वर्गसंघर्षावर भर दिलेला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहासलेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात; त्यात 'मार्क्सवादी इतिहासलेखन' हा एक प्रमुख प्रवाह आहे.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Hobsbawm, Eric (2007-06-28). Marxist History-writing for the Twenty-first Century. British Academy. ISBN 978-0-19-726403-4.