सामाजिक समूह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सामाजिक समूह हा प्राण्यांचा समूह होय.

समूह म्हणजे एकमेकांच्या सान्निध्यात असणे एकमेकांच्या निकट असणे. उदा. कपाटामध्ये लावून ठेवलेली पुस्तके, बांधकामासाठी रचून ठेवलेल्या विटा, हरणाचे कळप इ. हे सर्व समूह आहेत. हे घटक परस्परांच्या सान्निध्यात जरी असले तरी त्यांच्यात संबंध प्रस्थापित होत नाहीत. त्यांना परस्परांच्या अस्तित्वाची जाणीव नसते. एका बसमध्ये बसलेले सर्व प्रवासी देखील एका प्रकारचा समूह आहे. परंतु जेव्हा त्यांना परस्परांच्या अस्तित्वाची जाणीव होते तेव्हा सामाजिक समूह अस्तित्वात येतो.

इतर प्राण्यांच्या व वस्तूंच्या तुलनेत मानवी समूह अत्यंत महत्वाचा मानला जातो याचे प्रमूख कारण म्हणजे मानवामधील परस्पर संबंध प्रस्थापित होत असतात. समान ध्येय प्राप्तीसाठी एकत्रितपणे प्रयत्न केले जातात आणि संबंधाची व्यवस्था टिकून राहवी म्हणून व्यक्तीच्या वर्तनावर नियंत्रण ठेवले जाते.त्यामुळे मानवी समूह व्यक्तीच्या अस्तित्वासाठी समाजाच्या सातत्य व स्थैर्यासाठी अत्यंत आवष्यक आहे. या संकल्पनेची व्याख्या आणि स्वरूप पाहणे अत्यंत आवष्यक आहे.

सामाजिक समूहाची व्याख्या आणि वैषिष्टयेः-

1) जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्रित येवून परस्परांना प्रभावित करून आपल्या विविध गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा त्याला सामाजिक समूह असे म्हणतात.

2) सामाजिक समूह म्हणजे अषा व्यक्तीच्या समुह आहे कि ज्यांना आपल्या सदस्यात्वांची आणि संबंधांची जाणिव असते.

3) जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती ज्या बÚयाच कालावधी करता परस्परांषी संबंधीत असतात व समान ध्येय प्राप्तीसाठी एकत्रितपणे कार्य करतात त्याला सामाजिक समूह असे म्हणतात.

   वरील व्याख्येवरून सामाजिक समूहाची काही ठळक वैषिष्टये निदर्षनास येतात. या वैषिष्टयानुसार समूहाचे स्वरूप निदर्षनास येवू शकते.

1) किमान दोन व्यक्तींची आवष्यकताः

सामाजिक समूहाची निर्मिती किमान दोन व्यक्तींवर अवलंबून असते जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती बÚयाच कालावधीकरिता परस्परांषी संबंधित असतात. परस्परांच्या अस्तित्वाची जाणीव असते. तेव्हाच सामाजिक समूह निर्माण होतो. एकटा व्यक्ती सामाजिक समूह निर्माण करू शकत नाही. काही वेळा एखादया सभेला उपस्थित असणारी व्यक्ती त्यांच्यात परस्पर संबंध नसले तर त्यांना सामाजिक समूह म्हणता येणार नाही. समूहासाठी किमान दोन व्यक्तींची आवष्यकता आणि दिर्घ कालावधीचे परस्पर संबंध असले पाहिजेत.

2) समान ध्येयः

   सामाजिक समूहामध्ये कुटुंब, मित्र, परिवार, राजकीय पक्ष, कामातील सहकारी इ. चा समावेष झालेला आढळतो या सर्व समूहामध्ये समान ध्येय साध्य केली जातात.

उदा. एखादया राजकीय पक्षातील सर्व सदस्य निवडणूक जिंकून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये वेगवेगळया मार्गाचा अवलंब होवू शकतो.

उदा. कुटुंबाचा विकास व्हावा समृद्धी व्हावी सर्व सदस्य आनंदी व सुखी रहावे म्हणून सर्व सदस्य आपआपलया परिने प्रयत्न करून समान ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करतात.

3) मानसिक एकात्मताः

   सामाजिक समूहातील सदस्यांमध्ये मानसिक दृष्टया एकात्मता आढळते. त्यांच्यात आपलेपणाची भावना दिसून येते. समूहाचा समृद्धीमध्येच आपली समृद्धी आहे. समूहाच्या विकासामध्ये आपला विकास आहे. अषा प्रकारची भावना प्रत्येक सदस्यांची असते.

उदा. कुटुंबामध्ये सर्व सदस्य आपआपल्या परिने प्रयत्न करून कुटुंबाचा विकास करण्याचा प्रयत्न करतात. कारण कुटूंबाच्या विकासातूनच आपला विकास होऊ शकतो. एखादाय सदस्याला आनंद होईल म्हणून इतर सदस्य वैयक्तिक त्याग देखील करतात अषा प्रकारची भावना सामाजिक समूहामध्ये आढळते.

4) सहकार्य व परावलंबनः

   समूहाच्या सदस्यांध्ये सहकार्याची भावना दिसून येे सर्व सदस्य एकाच प्रकारची कामे करून अथवा वेगवेगळया प्रकारची कामे करून समान ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यामध्ये सहकार्याची भावना दिसून येते स्वतःपेक्षा समूहाला विषेष महत्व दिल्यामुळे ते परस्परांवर अवलंबून असतात कोणत्याही प्रसंगात ते एकत्रित असतात समूहाचा सुखात किंवा दुःखात ते मानसिक आधारासाठी इतर सदस्यांवर अवलंबून असतात. सदस्य परस्परांना प्रेरित करतात आपष्यक ती मदत करतात काही कारणांमुळे अपयष आल्यास ते परस्परांवर अवलंबून असतात.

समूहाचे महत्वः

   सामाजिक समूह हे व्यक्तीसाठी समूहासाठी अत्यंत महत्वाचे मानले जाते व्यक्तीचे अस्तित्व, समाजाची निर्मिती, आणि सातत्य हे समूहावर अवलंबून असते. व्यक्तीचा जन्म कुटुंब या समूहामध्ये होतो. जैविक अस्तित्वाची जाणीव कुटुंबामध्येच होते. बाल्यावस्थेत संगोपन, संवर्धन आणि समाजिकरणाची प्रक्रिया समूहामध्येच होते. व्यक्ती जे विविध गुण आत्मसात करते. ते देखील समूहामध्येच होऊ शकते. याषिवाय अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा आणि मानसिक, शारिरीक, अध्यात्मिक इत्यादी गरजा देखील समूहामध्येच पूर्ण होऊ शकतात. मनुष्य एक सामाजिक प्राणी आहे. त्याचे अस्तित्व समूहामध्येच टिकू शकते. जे विविध गुण तो आत्मसात करतो व इतर कौषल्यांचा विकास करतो. हे देखील समूहामध्ये शक्य आहे. रविंद्रनाथ टागोर सारखे साहित्यीक अािवा सुनिल गावस्कर सारखे खेळाडू यांचा विकास समूहामुळेच झालेला आहे. अषा प्रकारे व्यक्तीच्या विकासासाठी सामाजिक समूह अत्यंत आवष्यक आहे. याषिवाय मित्रांच्या समूहामध्ये व्यक्ती मनमोकळेपणाने बोलून  आपल्याला पडलेल्या प्रष्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतो. अनुभवांची देवाणघेवाण होते. इतर व्यक्तींच्या बाबतीत अधिक माहिती मिळते. अषाप्रकारे व्यक्तींच्या मानसिक विकास घडून येतो.

   व्यक्ती समूहात राहत असल्यामुळेच तो स्वतःची इतरांबरोबर तुलना करू शकतो या तुलनेतूनच आपल्याला विकास करण्याची प्रेरणा मिळते. कार्यक्षमतेत वाढ होते. आणि यामुळेच समूह व्यक्तींच्या कार्यक्षमतेत वाढ करून इतर कौषल्य प्राप्त करून व्यावसायिक विकास साधणयस मदत करते.

लहान-मोठे समूह एकत्रित मिळूनच समाजाची निर्मिती होते. समाजाचे स्वास्थ्य आणि स्थैर्य या समूहांवर अवलंबून असते. मित्र परिवार, कुटूंब, नातेवाईक कामातील सहकारी इत्यादी लहान समूहांपासून राजकीय पक्ष एखादया धर्माचे सदस्य इत्यादीसारखे मोठे समूह परस्परांषी संबंधित असतात कोणत्याही एका समूहात अडथळे अथवा विघ्न निर्माण झाले तर त्याच परिणाम संपूर्ण समाजव्यवस्थेवर होत असतो. त्यामुळे समूह समाजाच्या सातत्यासाठी आणि स्थैर्यासाठी अत्यंत आवष्यक आहे.

सामाजिक समूहांचे वर्गीकरणः-

   समाजषास्त्रज्ञांनी सामाजिक समूहांचे वर्गीकरण करताना वेगवेगळया तत्वाचा आधार घेतलेला आहे. त्या तत्वांच्या आधारे समूहांचे अनेक प्रकार करता येतात.

1) आकारः

   समूहाच्या आकारातून त्याचे दोन प्रकार करता येतात. जया समूहामध्ये सदस्यांची संख्या कमी आहे अषा समहाला लहान समूह असे म्हणतात.

उदा. कुटुंब, मित्र, नातेवाईक, इत्यादी.

ज्या समूहामध्ये सदस्यांची संख्या जास्त आहे.

उदा. राजकीय, पक्ष, जात, धर्म, इत्यादी यांना मोठा समूह असे म्हणतात.

2) व्यक्तीगत इच्छाः

   व्यक्तीच्या इच्छेवरून समूहाचे प्रकार करता येातत. व्यक्ती ज्या समूहांचा सदस्य जन्मापासून असतो अथवा ज्याचे सदस्यत्व टाळता येत नाही त्याला अनैच्छिक समूह असे म्हणतात.

उदा. जात, धर्म, कुटुंब, इत्यादी, यांचे सदस्यत्व जन्मानेच रप्राप्त होत असते. याउलट ज्या समूहाचे सदस्यत्व सिव्कारणे अथवा न स्विकारणे व्यक्तीच्या हातामध्ये असते. त्याला एैच्छिक समूह असे म्हणतात.

उदा. राजकीय पक्ष, मित्र, नोकरीचे ठिकाण.

3) कालमर्यादाः

जे समूह अल्प कालावधीकरिता निर्माण झालेले असतात व आपला हेतू साध्य झाल्यानंतर ते विसर्जित होतात त्यांना अस्थायी समूह असे म्हणतात.

उदा. गणेषमंडळ अथवा नवरात्र मंडळातील सदस्या याउलट जे समूह स्थिर स्वरूपाचे असतात. ज्यातील सदस्य बदलतात परंतु समूह टिकून राहतो अषा समूहाला स्थायी समूह असे म्हणतात.

उदाः राज्यसभेतील सदस्यांचा समूह होय.

4) हितसंबंधः

   काही व्यक्ती विषेष ध्येय साध्य करण्यासाठी एकत्र आलेले असतात.

उदा. सैन्यामधील काही अधिकारी विषेष कामगिरी बजावण्यासाठी एकत्र येतात. त्यांच्या समूहाला विषिष्ट हितसंबंध समूह असे म्हणतात. याउलट काही व्यक्ती दैनंदिन जीवनातील जबाबदारी म्हणून एकत्र आलेले असतात.

उदा. बॅंकेतील कर्मचाÚयांचे समूह अथवा मित्रपरिवार याला सामान्य हितंसंबंध समूह असे म्हणतात.

5) सदस्यत्वः

   व्यक्ती आपल्या जिवनामध्ये ज्या-ज्या समूहांचा सदस्य असतो ते समूह त्याच्यासाठी अंतरसमूह म्हणून ओळखले जातात.

उदा. एखादा षिक्षक हा त्याच्या कुटूंबाचा, त्याचा मित्रांचा अथवा षिक्षक संघटनेचा सदस्य असू शकतो परंतु व्यापारांच्य संघटनेचा तोच सदस्य नसतो. यावरून व्यक्ती ज्या समूहांचा सदस्य नाही ते समूह त्याच्यासाठी बर्हिसमूह म्हणून ओळखले जातात.

6) संबंधाचे स्वरूपः

   व्यक्तींमधील संबंध हे कोणत्या प्रकारचे आहेत. यावरून समूह निष्चित केले जातात. व्यक्तींमधील संबंध समोरासमोरचे जवळचे  आत्मियतेचे असले तर अषा संबंधंाना प्राथमिक संबंध असे म्हणतात. प्राथमिक संबंध असणाÚया समूहांना प्राथमिक समूह असे म्हणतात. याउलट त्या संबंधामध्ये व्यवहाराकरिता आहे जे संबंध कामापुरते आहेत असे संबंध असणाÚया व्यक्तींच्या समूहाला दुय्यम समूह असे म्हणतात. अषा प्रकारे समूहाचे वर्गीकरण करणे शक्य आहे.

2) एखादी व्यक्ती स्वतःचे मूल्यमापन करण्यासाठी ज्या समूहाचा संदर्भ घेते त्याला संदर्भसमूह असे म्हणतात.

3) व्यक्ती आपल्या श्रध्दा, अभिवृत्ती मूल्ये यांची व्याख्या करण्यासाठी आणि आपल्या वर्तनाला दिषा देण्यासाठी ज्या समूहाचा वा सामाजिक प्रवर्गाचा वापर करते त्याला संदर्भ समूह असे म्हणतात.

4) हॅरी जाॅन्सन:- स्वतःचे स्वतःच्या परिस्थीतीचे व्यक्तीगत आकांक्षाचे किंवा स्वतःच्या समूहाचे वा त्याच्या आकांक्षाचे मूल्यमापन करताना वापरण्यात येणा-या संदर्भ चैकटीचा भाग असणा-या वास्तव वा कल्पित अषा कोणत्याही समूहाविषयीचे व्यक्तीचे संकल्पन हा एखादया व्यक्तीचा संदर्भ समूह असू षकतो.

संदर्भ समूहाचे प्रकार

   1) नकारात्मक संदर्भ समूह

   2) आकांक्षित संदर्भ समूह

नकारात्मक:-

   एखादी व्यक्ती कषाचा त्याग करावा वा कषाला विरोध करावा यासंबंधी दिषा पा्रप्त व्हावी म्हणून ज्या समूहाचा व त्याच्या क्रियंाचा वापर करते त्या समूहाला नकारात्मक संदर्भसमूह असे म्हणतात.

या व्याख्येवरून असे आपण म्हणू षकतो की नकारात्मक संदर्भ समूहाच्या विरूध्द वर्तन प्रकारंाचा व मुल्यांचा व्यक्ती स्वीकार करते.

आकांक्षित संदर्भ समूह:-

   ज्या समूहात सदस्य म्हणून आपल्याला मान्यता मिळावी अषी व्यक्तीची इच्छा असते त्याला आकांक्षित संदर्भ समूह असे म्हणतात.

   अषा संदर्भ समूहात सदस्य होण्यासाठी काही विषिष्ट नियम किंवा अटींची पूर्तता होणे आवष्यक आहे.

   उदा.  होण्यासाठी मंत्री होण्यासाठी होण्यासाठी काही पुर्तता करणे जरूरीचे आहे.