Jump to content

मायक्रोसॉफ्ट ऑफिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


मायक्रोसॉफ्ट ऑफिस
मायक्रोसॉफ्ट ऑफिस
मायक्रोसॉफ्ट ऑफिस
मूळ लेखक मायक्रोसॉफ्ट
विकासक मायक्रोसॉफ्ट
प्रारंभिक आवृत्ती इ.स. १९९०
सद्य आवृत्ती मायक्रोसॉफ्ट ऑफिस २०१९
विकासाची स्थिती समर्थित
प्रोग्रॅमिंग भाषा सी++
संगणक प्रणाली मायक्रोसॉफ्ट विंडोज
भाषा ३५ हून अधिक
सॉफ्टवेअरचा प्रकार कार्यालयीन सॉफ्टवेर संच
सॉफ्टवेअर परवाना प्रताधिकारित
संकेतस्थळ मायक्रोसॉफ्ट ऑफिस

मायक्रोसॉफ्ट ऑफिस (इंग्लिश: Microsoft Office) हा विविध कार्यालयीन कामकाजासाठी उपयुक्त अश्या उपयोजन सॉफ्टवेरांचा संच आहे. हा संच मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन या कंपनीनद्वारे विंडोजमॅकिंटॉश ओएस एक्स संगणकप्रणालींसाठी बनवला व वितरीत केला जातो. मायक्रोसॉफ्ट ऑफिसची सर्वात अद्ययावत आवृत्ती मायक्रोसॉफ्ट ऑफिस २०१९ आहे.

घटक सॉफ्टवेर

[संपादन]

मायक्रोसॉफ्ट ऑफिस मध्ये खालील घटक सॉफ्तवेअरे समाविष्ट आहेत:

हे मायक्रोसॉफ्ट ऑफिस संचातील खासकरून 'लेखन-संपादन' कामासाठी लिहिलेले सॉफ्टवेर आहे. या सॉफ्टवेराचा .डॉक (.doc) हा फॉरमॅट संगणक लेखन दस्त‌ऐवजांमध्ये प्रमाण फॉरमॅट म्हणून गणला जाण्याइतका लोकप्रिय झाला आहे. मायक्रोसॉफ्ट वर्ड सॉफ्टवेरात मराठी लिहिण्यासाठी अनेक 'फॉंट', अर्थात संगणक टंक, उपलब्ध आहेत.

हे गणिते, स्तंभालेख इत्यादी करण्यासाठी, लेखा राखण्यासाठी उपयुक्त असे उपयोजन सॉफ्टवेर आहे. कार्यालयांमध्ये केल्या जाणाऱ्या गणन क्रियांसाठी हे सॉफ्टवेर लोकप्रिय ठरले आहे.

मायक्रोसॉफ्ट पावरपॉइंट

[संपादन]

माहिती सादरीकरणासाठी वापरले जाणारे हे उपयोजन सॉफ्टवेर आहे.

मायक्रोसॉफ्ट आउटलूक

[संपादन]

हे विपत्रांच्या देवाणघेवाणीसाठी व व्यवस्थापनासाठी उपयुक्त असलेले उपयोजन सॉफ्टवेर आहे.

बाह्य दुवे

[संपादन]