Jump to content

महानुभाव परिषद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे ३४वे अधिवेशन डोमेग्राम (कमालपूर, ता. श्रीरामपूर) येथे भरले होते. त्याच्या उद्‌घाटनप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांचे भाषण झाले. त्यावेळी ते म्हणाले. "इसवी सनाच्या तेराव्या शतकात मानवतेला लागलेला भेदाभेदांचा कलंक दूर करण्याचा प्रयत्न श्री चक्रधर स्वामिनी महानुभाव पंथाच्या माध्यमातून केला. आजही समाजातील विषमता, उच्चनीचता दूर करण्याची आणि समतेचे चाक गतिमान करण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे सिद्धान्त महत्त्वाचे आहेत,[ संदर्भ हवा ]

भुजबळ पुढे म्हणाले, "प्रवाहाबरोबर सगळेच पोहतात, कचराही वाहतो; मात्र विरुद्ध दिशेने जो पोहतो, त्याच्यात मोठे कर्तृत्त्व व धाडस असते. मराठी भाषेत ज्ञान आणणारे ज्ञानेश्‍वर, सर्वज्ञ श्री चक्रधरांप्रमाणेच महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज यांनाही वेदना सहन कराव्या लागल्या.सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी एक पाऊल पुढे टाकले. त्यांनी निर्माण केलेल्या महानुभाव पंथात मोठी शक्ती आहे. मात्र, अजूनही ज्या गावात असे अधर्माचे कृत्य चालते, तेथे आवाज उठविला जात नाही. प्रत्येक जण ’मी,' ’माझे' असे पाहतो आहे. त्याच्याविरुद्ध आज उभे राहावे लागेल. [ संदर्भ हवा ]

त्यावेळचे महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, "सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा कालखंड समाजजागृती करण्याचा कालखंड होता. त्यांनी सर्व जाती, धर्म, पंथ यांना एकत्र घेऊन संप्रदायाची स्थापना केली. त्या वेळी प्रसारमाध्यमे नसताना धर्मप्रसारक पुढे येतो व देशात विचार पोचविण्याचे काम करतो, हा दैवी चमत्कारच आहे. सामान्यांपर्यंत ज्ञान पोचविणे हा विचार घेऊन चक्रधर स्वामींनी ग्रंथांद्वारे साहित्य निर्माण केले. हे त्याचे उगमस्थान आहे. मराठी व तत्कालीन भाषेत सर्वांत जास्त साहित्य निर्माण झाले. भाषा समृद्ध करण्याचे काम झाले. गीता प्राकृत भाषेत आणून ती सर्वसामान्यांपर्यंत नेली गेली.

श्री. बबनराव पाचपुते म्हणाले, ""आम्हा राजकारण्यांना अनेक ठिकाणी इच्छा नसताना जावे लागते. येथे ईश्‍वराचे ध्यान असते म्हणून यायला मिळाले. पूर्वीच्या काळी अध्यात्म बाजूला गेले होते. ठराविक लोकांनी अध्यात्माचा ताबा घेतला होता. अशा वेळी प्रत्यक्ष भगवंताने अवतार घेऊन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी रूपाने क्रांती केली. २१ वे शतक ज्ञान, विज्ञान तंत्रज्ञानाचे आहे. जैवतंत्रज्ञान, सूक्ष्म ज्ञान आज जागेवर मिळत आहे. हे ज्ञानाचे शतक असले, तरी त्याला अध्यात्माची गरज आहे. दान देणारे खूप आहेत; परंतु ते सत्पात्री असावे. कुडव यांनी खूप मोठे काम केले आहे,

या वेळी अध्यक्ष कारंजेकर बाबा, महंत बाभूळगावकर शास्त्री, अधिवेशनाचे सचिव सुभाष पावडे, आचार्य साळकर बाबा यांची भाषणे झाली. श्री. देवकर यांनी कुडव यांना दिलेल्या मानपत्राचे वाचन केले. श्री. पाचपुते यांच्या हस्ते ’अपूर्व’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. सकाळी सातला दीक्षा विधी, गीतापाठ, ध्वजारोहण व गीज झाले. बीडकर बाबा यांच्या हस्ते छिन्नस्थळी मंदिराचे भूमिपूजन झाले, तसेच सागर कुडव यांनी तयार केलेल्या ’सर्वज्ञ समाज’ या वेबसाइटचे उद्‌घाटन झाले. सूत्रसंचालन डॉ. वेदश्री थिगळे यांनी केले. या वेळी महंत नागराज बाबा, महंत कापूसतळणीकर बाबा, महंत विद्वांस बाबा शास्त्री, महंत गोपीराज बाबा, सुरेश लोथे, भास्करराव मुरकुटे, सरपंच अनिल गोरे, ॲड. अरुण ठाकरे, महंत कृष्णराज बाबा शास्त्री, सागर कुडव, प्रज्ञा कुडव, सौ. ज्योती कुडव आदी उपस्थित होते.

श्री. भुजबळ यांच्या हस्ते परममार्ग सेवक सीताराम कृष्णाजी कुडव यांना "महानुभाव रत्न' पुरस्कार प्रदान करण्यात आला, तसेच कुडव यांनी संपादित केलेल्या ’अनुभवावा महानुभाव' या गौरव ग्रंथाचे प्रकाशन झाले.

हे सुद्धा पहा

[संपादन]

महानुभाव पंथ ; महानुभाव साहित्य संमेलन.