Jump to content

मराठी भाषेत रूढ झालेले काही फारसी शब्द

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मराठी भाषेत प्रक्षिप्त फारसी शब्द या पानावरून पुनर्निर्देशित)

फारसी ही सध्याच्या इराण व पूर्वीच्या पर्शियन साम्राज्याची भाषा आहे. सुमारे इ.स. १२९६ मध्ये फारसी ही भाषा त्याकाळच्या दिल्लीच्या शासनासोबत (बघा: अल्लाउद्दीन खिलजी) महाराष्ट्रात आली. त्यानंतर शासन कारभारात, बहामनी राज्यकर्त्यांमुळे फारसी भाषेचा वापर वाढला.फारसी भाषा सुमारे ३९१ वर्षे महाराष्ट्रात होती. त्यामुळे मराठी भाषेवर त्याचा प्रभाव पडला. फारसीचा मराठी भाषेवरील परिणाम कमी व्हावा म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकानंतर, राज्यव्यवहार कोश तयार करण्यास सांगितले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भाषा शुद्धीकरणासाठी खूप प्रयत्न केले. त्यांनी मराठी भाषेला काही नवीन शब्द दिले, पण जुने फारसी प्रचलित शब्द तितक्याच जोमाने, पण जराशा वेगळ्या अर्थाने कायम टिकून राहिले.

अनु.क्र.फारसी शब्दभाषांतरित मराठी पर्यायी शब्द
दरबारराजसभा
सवालप्रश्न
खानापेठ (?)/जेवण
कारंजेतुषार
दालनकक्ष
बुरुजतटबंदी
रंगमहालविलासमंदिर
जप्तहरण
फौजसैन्य
१०जमीनभूमी, धरती, भुई
११किल्लीचावी
१२अदालतखानान्यायालय
१३जुमलागृह
१४बक्षीसपारितोषिक
१५मुदपाकखानास्वयंपाकघर
१६भूख (?)भूक
१७नर्तकीनृत्यांगना
१८खुर्चीचारपायी आसन (?)
१९संदूकपेटी
२०तब्येतप्रकृती
२१तारीखदिनांक
२२बाजारपेठ
२३बुरुजतटबंदी
२४जबाबदारीउत्तरदायित्व

असे अनेक शब्द आहेत.