मराठा चित्रशैली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिवाजी महाराज स्वारी

मराठा साम्राज्याच्या काळातील चित्राची शैली उदयास आली होती त्या चित्र शैलीस मराठा चित्रशैली असे म्हणतात.इसवी सनाच्या सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठा चित्रशैली विकसित होण्यास सुरुवात झाली. सचित्र हस्तलिखित पोथ्या, पोथ्यांच्या खाली आणि वर ठेवण्यात येणाऱ्या लाकडी फळ्यांवरील चित्रे , काचचित्रे आणि भित्तिचित्रे या विविध स्वरूपांत मराठा चित्रशैलीचा आविष्कार आढळतो.या शैलीतील चित्रे रंगीत असून ती भित्तिचित्रे आणि हस्तलिखितामधील लघुचित्रे यांच्या स्वरूपांतील आहेत. वाड्यांचे दर्शनी भाग,दिवाणखाने,मंदिरांचे मंडप,शिखरे व छत यांवर मराठा चित्रशैलीतील भित्तिचित्रे पाहण्यास मिळतात.या चित्रशैलीवर राजपूत आणि माळवा चित्रशैलीचा;तसेच युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव पडलेला दिसून येतो.[१]

  1. ^ भारतातील चित्रशैली