राजपूत चित्रशैली
राजपूत रंगकामाला ,राजस्थानी रंगकाम ही म्हणले जाते, भारतातील राजपुताना दरबारात राजस्थानी रंगकाम विकसित झाले व भरभराटीस आले.[१] प्रत्येक राजपुताना राज्याने रंगकामाची वेगळी पद्धत निर्माण केली, पण काही वैशिष्ट्य समान होते. राजपूत रंगकाम हे वेगवेगळ्या कला, महाकाव्यातील प्रसंग दर्शवतात जसे रामायण. अल्बम मध्ये ठेवण्यासारख्खा सुक्ष्म हस्तलिखिताला राजपूत रंगकामात प्राधान्य होते पण काही चित्रकला ह्या महालाच्या भिंतींवर, किल्ल्याच्या आतील दालनांवर व हवेलीवर करण्यात येत असे, यामध्ये मुख्यत: शेखावतांची हवेली ,किल्ले आणि शेखावत राजपूतांद्वारे निर्मित महाल पण समाविष्ट होते.[२] रंग हे विशिष्ट क्षार, वृक्ष, शंख-शिंपले ह्यांना पिळुन आणि बहुमोल दगडांवर प्रकिया करून निर्माण केले जात असे. रंग बनवतांना सोने आणि चांदी यांचाही उपयोग होत असे. इच्छित असलेले रंग तयार करण्याची मोठी प्रकिया असे, काही रंग बनवतांना तर आठवडा लागत असे. वापरले जाणारे ब्रश हे खुप सुंदर असत.
विद्यालये
[संपादन]सोळाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात राजपूत कला शाळांनी ,स्थानिक व परदेशी प्रभाव एकत्र करण्याची विशिष्ट पद्धत निर्माण केली. राजस्थानी रंगकामात चार प्रमुख विद्यालये होती, त्यात विशिष्ट प्रकारच्या शैली आढळून येत होत्या ज्या त्या कलाकारांना आश्रय दिलेल्या राजघराण्यांचा ठसा उमटवत होत्या.[३]
चार प्रमुख विद्यालये खालीलप्रमाणे -
१) मेवर विद्यालय ,जिथे चांवद, नाथद्वारा, देवगढ,उदयपुर आणि सावर पद्धतीचे रंगकाम समाविष्ट होते.
२) मारवार विद्यालयात किशनगड ,बिकानेर, जोधपुर, नागौर, पाली आणि घनराव पद्धतीचा समावेश आहे.
३) हदोती विद्यालय हे कपटा,बुंदी, आणि झलावर पद्धतीचे होते.
४) धुंदेर विद्यालयात आंबेर, जयपुर, शेखावती आणि उनियारा पद्धतीचे रंगकाम होते.
कांगरा आणि कुल्लू येथील विद्यालय सुद्धा राजपूत रंगकामाचा भाग होते. पहाडी रंगकामाचे प्रसिद्ध रंगकार "नैनसुख" हे राजपूत राजासाठी काम करत होते, ज्यांची उत्तरेत सत्ता होती.[४] व्यापारी समुदायाची आर्थिक भरभराटी, वैष्णवांचे, पुनरुज्जीवन आणि भक्ती समुदायाचा विकास ह्या प्रमुख घटकांनी राजस्थानी रंगकामाच्या विकासात हातभार लावला. रंगकाम पद्धतीच्या सुरुवातीच्या काळात धार्मिक अनुयायांचा मोठा प्रभाव होता उदा. रामानुजा, मीराबाई , तुलसीदास, श्री चैतन्य, कबीर आणि रामानंद.
संपूर्ण राजपुताना हे मुघलांच्या हल्ल्याने प्रभावीत झाले पण मेवार हे शेवटपर्यंत मुघलांच्या हातात आले नाही, हेच कारण होते कि, राजस्थानी विद्यालये मेवर, जयपुर, जोधपुर, बुंदी, कोटा-कलाम, किशनगढ ,बिकानेर आणि राजस्थानच्या विविध भागात विकसीत झाले.
संदर्भ
[संपादन]- ^ "Rajput Painting".
- ^ "Rajput Paintings – The splendour of Rajashtan art". 2017-05-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-05-15 रोजी पाहिले.
- ^ "Different Types of Rajput Paintings".
- ^ "Art historian BN Goswamy brings painter Nainsukh to Bangalore".