मंजिरी धामणकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मंजिरी धामणकर (जन्म : ११ नोव्हेंबर, इ.स. १९५९) या एकपात्री नाट्य सादर करणाऱ्या एक मराठी कलावंत, कवयित्री आणि लेखिका आहेत. ‘चर्पटमंजिरी’ हे त्यांच्या मराठी-हिंदी एकपात्री कार्यक्रमाचे नाव आहे.

संगीत शिक्षण[संपादन]

मंजिरी धामणकर या एकपात्री खेरीज शास्त्रीय व सुगम संगीत गायन, नाटिका लेखन, व सूत्रसंचालन याही गोष्टी करतात. शास्त्रीय व सुगम संगीत गायन, नाटिका लेखन, व सूत्रसंचालन याही गोष्टी करतात. हिराबाई बडोदेकर, पौर्णिमा धुमाळे तळवलकर, राजाभाऊ देव व अलका मारुलकर यांच्याकडे त्या गाणे शिकल्या.

रेडिओवरील कार्यक्रम[संपादन]

रेडिओवरील सुधीर गाडगीळ यांच्या ‘चैत्रबन’ या कार्यक्रमात तसेच अन्य काही कार्यक्रमांत मंजिरी धामणकर यांचे सुगम संगीत सादर झाले आहे. त्यांनी लिहिलेल्या कविता वृत्तपत्रांतून आणि अन्य नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांनी लिहिलेली गाणी साधना सरगम या गायिकेने गायली आहेत.

सूत्रसंचालन[संपादन]

मंजिरी धामणकर यांनी संगीताच्या कार्यक्रमांचे, संमेलनांचे आणि हिंदी-मराठी-उर्दू पुस्तकांच्या किंवा सीडींच्या प्रकाशन समारंभांचे सूत्रसंचालन केले आहे.

लेखन[संपादन]

  • अनुवाद, उन्मेष मंजिरी आणि आशना या ललित लेख असलेल्या पुस्तकांचे लेखन
  • आकाशवाणीसाठी अनेक श्रुतिकांचे आणि करमणुकीच्या कार्यक्रमांच्या सादरीकरणाचे लेखन
  • दूरदर्शनवर झालेल्या ‘निसर्गोपचार’ या माहितीपटाचे लेखन
  • वृत्तपत्रांत आणि अन्य नियतकालिकांत लेखन
  • ई-मराठी या दूरचित्रवाणीसाठी नाट्यलेखन
  • कॅलेंडरांवरील मजकूर, जाहिराती, भेटकार्डे आणि घोषवाक्ये यांचे लेखन

अभिनय[संपादन]

पुरस्कार[संपादन]

  • ‘अनुवाद’ या पुस्तकासाठी २०१४ सालचा मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार
  • २०१७ सालचा मालती पटवर्धन पुरस्कार