भोजा एर फ्लाइट २१३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भोजा एअर फ्लाइट २१३ या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
भोजा एर फ्लाइट २१३
अपघात सारांश
तारीख एप्रिल २०, २०१२
प्रकार अन्वेषणाधीन
स्थळ इस्लामाबाद, पाकिस्तान
33°39′46″N 72°59′07″E / 33.66278°N 72.98528°E / 33.66278; 72.98528
प्रवासी ११८
कर्मचारी
मृत्यू १२७
बचावले कुणीही नाही.
विमान प्रकार बोईंग ७३७-२००
वाहतूक कंपनी भोजा एर, खाजगी कंपनी.
विमानाचा शेपूटक्रमांक AP-BKC
पासून जिना आंतरराष्ट्रीय विमानतळ, कराची
शेवट बेनझीर भुट्टो आंतरराष्ट्रीय विमानतळ, इस्लामाबाद


२० एप्रिल २०१२ रोजी भोजा एरच्या फ्लाइट क्रमांक २१३ च्या वेळी बोईंग ७३७-२०० प्रकारचे विमान अपघातग्रस्त होऊन विमानातील सर्व १२७ प्रवासी मृत्त्युमुखी पडले.

अपघात[संपादन]

दिनांक एप्रिल २०, २०१२ला भोजा एरचे बोईंग ७३७-२०० विमान, फ्लाइट क्रमांक २१३ च्या दरम्यान कराचीच्या जिना आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून बेनझीर भुट्टो आंतरराष्ट्रीय विमानतळ, इस्लामाबादच्या दिशेने स्थानिक उड्डाण करीत होते. [१] विमान गंतव्य स्थानासाठी १० किलोमीटर अंतर राहिले असताना, हुसेन आबाद ह्या खेड्यानजीक स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ६.४० वाजता दुर्घटनाग्रस्त झाले. विमानात ११ मुले धरून एकूण १२१ प्रवासी आणि ६ कर्मचारी होते. अपघातात सर्वच प्रवासी मृत्युमुखी पडले.

प्रवासी आणि कर्मचारी[संपादन]

अपघातग्रस्त प्रवाशांमध्ये एक अमेरिकन, आणि बाकीचे पाकिस्तानी नागरिक होते. [२]

राष्ट्रीयता मृत एकूण
प्रवासी कर्मचारी
पाकिस्तान पाकिस्तान १२० १२६
अमेरिका अमेरिकन
एकूण १२१ १२७

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भोजा एर फ्लाइट २१३ दुर्घटना -". 20 April 2012. 20 April 2012 रोजी पाहिले.
  2. ^ भोजा एर फ्लाइट पाकिस्तान दुर्घटना : प्रवाशांची यादी