भूशिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
केप ऑफ गुड होप या भूशिराचे केप पॉइंट या ठिकाणाहून दिसणारे दृश्य (इ.स. २००८)

भूशिर [श १] म्हणजे समुद्रात किंवा सरोवरात घुसलेले जमिनीचे निमुळत्या टोकासारखे दिसणारे भूरूप होय. भूशिराप्रमाणेच द्वीपकल्पाच्याही[श २] ठायी तीन बाजूंस पाण्याने वेढलेले, निमुळते होत जाणारे जमिनीचे भूरूप असते. मात्र अशा भूरूपाचा विस्तार विशाल असला, तरच त्यास द्वीपकल्प ही संज्ञा वापरतात; तर स्थानिक व्याप्तीच्या, छोट्या विस्ताराच्या अशा भूरूपांस भूशिर या संज्ञेने उल्लेखले जाते[१].

आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकास वसलेले केप ऑफ गुड होप हे भूशिर, तसेच जिब्राल्टर सामुद्रधुनीच्या उत्तरेकडील व दक्षिणेकडील टोकांस असलेली दोन भूशिरे इत्यादी भूशिरे प्रसिद्ध आहेत.

पारिभाषिक शब्दसूची[संपादन]

  1. ^ भूशिर (इंग्लिश: Headland / Cape, हेडलॅंड / केप)
  2. ^ द्वीपकल्प (इंग्लिश: Peninsula, पेनिन्शुला)


संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ कुलकर्णी, एल.के. भूगोलकोश.


Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.