Jump to content

भीम ॲप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भीम अॅप या पानावरून पुनर्निर्देशित)

भीम ॲप म्हणजे भारत इंटरफेस फॉर मनी हे एक मोबाईल ॲप्लिकेशन आहे. या ॲप्लिकेशनची निर्मिती "नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया" या भारत सरकारच्या आर्थिक देवाण घेवाण प्रणाली विकसित व देखभाल करणाऱ्या संस्थेने केली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘भीमराव’ या नावावरून या ॲपला भीम हे नाव देण्यात आले आहे. सध्या हे ॲप अँड्रॉइड व आयओएस या मोबाईल संगणक प्रणालींवर वापरण्यासाठी उपलब्ध आहे. आत्तापर्यंत हे ॲप १ कोटी ४० लाख जणांनी मोबाईलवर डाऊनलोड केले आहे. हे ॲप युनिफाईड पेमेंट इंटरफेस या प्रणालीवर आधारित आहे.[ संदर्भ हवा ]

सभासद

[संपादन]

भारतातल्या ४४ राष्ट्रीय आणि खाजगी बँका या ॲप्लिकेशनच्या सभासद आहेत. या ॲप्लिकेशनचा वापर करून आपण ४४ बँकांपैकी कुठल्याही बँकेतल्या स्वतःच्या खात्यातून पैशांची डिजिटल देवाण घेवाण करू शकतो.[ संदर्भ हवा ]

बँकांची यादी

[संपादन]
  • १. ॲक्सिस बँक
  • २. अलाहाबाद बँक
  • ३. आंध्र बँक
  • ४. आयडीएफसी बँक
  • ५. आयडीबीआय बँक
  • ६. आयसीआयसीआय बँक
  • ७. आरबीएल बँक
  • ८. इंडसइंड बँक
  • ९. इंडियन ओव्हरसीज बँक
  • १०. इंडियन बँक
  • ११. एचएसबीसी बँक (हॉंगकॉंग शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन लिमिटेड)
  • १२. एचडीएफसी बँक (हाउसिंग डेव्हलपमेन्ट अँड फायनान्सिंग कॉर्पोरेशन बँक)
  • १३. ओरियेन्टल बँक ऑफ कॉमर्स
  • १४. कॅथॉलिक सिरियन बँक
  • १५. कॅनरा बँक
  • १६. करूर वैश्य बँक
  • १७. कर्नाटक बँक
  • १८. कोटक महिंद्र बँक
  • १९. कॉर्पोरेशन बँक
  • २०. टीजेएसबी (ठाणे जनता सहकारी बँक)
  • २१. डीसीबी बँक
  • २२. देना बँक
  • २३. पंजाब नॅशनल बँक
  • २४. फेडरल बँक
  • २५. बँक ऑफ इंडिया
  • २६. बँक ऑफ बडोदा
  • २७. बँक ऑफ महाराष्ट्र
  • २८. युको बँक (युनायटेड कमर्शियल बँक)
  • २९. युनायटेड बँक ऑफ इंडिया
  • ३०. युनियन बँक ऑफ इंडिया
  • ३१. येस बँक
  • ३२. लक्ष्मी विलास बँक
  • ३३. विजया बँक
  • ३४. साउथ इंडियन बँक
  • ३५. सिटी युनियन बँक
  • ३६. सिंडिकेट बँक
  • ३७. सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया
  • ३८. स्टॅंडर्ड चार्टर्ड बँक
  • ३९. स्टेट बँक ऑफ
  • ४०. स्टेट बँक ऑफ
  • ४१. स्टेट बँक ऑफ इंडिया
  • ४२. स्टेट बँक ऑफ
  • ४३. स्टेट बँक ऑफ
  • ४४. स्टेट बँक ऑफ

पर्याय

[संपादन]

या ॲपवरून पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत. या पर्यायांपैकी कुठल्याही एका पर्यायाचा वापर करून देवाणघेवाण करता येते.[ संदर्भ हवा ]

  • पैसे पाठवण्यासाठी :

१. ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा बँक खाते क्रमांक व आयएफएससी कोड वापरून. किंवा
२. ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा मोबाईल क्रमांक वापरून. किंवा
३. ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस वापरून.[ संदर्भ हवा ]

  • पैसे स्वीकारण्यासाठी :

१. ज्याच्याकडून पैसे स्वीकारायचे आहेत त्याचा व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस वापरून.
२. ज्याच्याकडून पैसे स्वीकारायचे आहेत त्याचा मोबाईल क्रमांक वापरून.
३. स्वतःचा क्यूआर कोड वापरून.[ संदर्भ हवा ]

संदर्भ

[संपादन]