Jump to content

भाग्यश्री ठिपसे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भाग्यश्री ठिपसे (४ ऑगस्ट, १९६१ सांगली - ) (लग्नापूर्वी: भाग्यश्री साठे) या भारतीय बुद्धिबळ खेळाडू आहेत. या महिला इंटरनॅशनल मास्टर असून त्यांनी पाच वेळा भारतीय महिला बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे.

साठे ठिपसे यांना भारत सरकारकडून पद्मश्री तसेच अर्जुन पुरस्कार मिळाले आहेत.

भागश्री ठिपसे या जागतिक ग्रँड मास्टर स्पर्धा जिंकणाऱ्या पहिल्या महिला बुद्धिबळपटू असल्यामुळे त्यांना नुकतेच फर्स्ट लेडी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

भागश्री ठिपसे या जागतिक ग्रँड मास्टर स्पर्धा जिंकणाऱ्या पहिल्या महिला बुद्धिबळपटू आहेत. या मुंबई येथे राहतात. त्यांनी पाच वेळा बुद्धिबळातील मानाचा असा राष्ट्रीय चॅंपियनशीपचा मान मिळविला आहे तसेच,त्या साल १९११ मध्ये महिला आशियाई स्पर्धेच्या मानकरी होत्या. राष्ट्रकुल देशांच्या खेळात व स्पर्धेत त्यांना तीन वेळा रजत पदक प्राप्त झाले आहे. १९८६ सालातील जागतिक बुद्धिबळ संघाचा 'जागतिक महिला मास्टर' हा बहुमान त्यांनी मिळविला आहे. बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे हे त्यांचे पती आहेत.