फर्स्ट लेडी पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फर्स्ट लेडी पुरस्कार हा भारताच्या केंद्र शासनातर्फे दिला जाणारा एक पुरस्कार आहे. हा पुरस्कार भारतातील विविध क्षेत्रात विक्रम स्थापित करणाऱ्या महिलांना दिला जातो.भारत सरकारच्या केंद्रिय महिला व बालविकास मंत्रालयातर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. इसवी सन २०१८ मध्ये भारतातील ११२ महिलांना हा पुरस्कार देण्यात आला. यात महाराष्ट्रातील १६ महिलांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील पुरस्कृत महिला[संपादन]

क्रमांक नाव गाव पुरस्कार कशासाठी
सुरेखा यादव सातारा पहिल्या महिला प्रवासी रेल्वेचालक,रेल्वेची महिलांची महिला स्पेशल लोकल ट्रेन चालविली
भागश्री ठिपसे बुद्धिबळपटू, पाच वेळा राष्ट्रीय चॅंपियनशीप, जागतिक महिला मास्टर बहुमान
हर्षिनी कण्हेकर नागपूर अग्निशमन अधिकारी
शीला डावरे परभणी जिल्हा प्रथम महिला ऑटोरिक्षाचालक
डॉ. भारती लव्हेकर वर्सोवा, मुंबई आमदार, पहिली महिला सॅनिटरी बँक स्थापना
अरुणा राजे पाटील पुणे चित्रपटसृष्टी तंत्रज्ञ
डायना एडलजी भारतीय महिला क्रिकेट एकदिवसीय संघ कर्णधार
स्नेहा कामत मुंबई कार ड्रायव्हींग प्रशिक्षण संस्था स्थापना
रजनी पंडित नोंदणीकृत गुप्तहेर
१० स्वाती परिमल मुंबई असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अअँड इंडस्ट्रिज ऑफ इंडिया
११ उपासना मकाती अंधांसाठी व्हाईट प्रिंट लाइफ स्टाईल हे ब्रेल लिपीतील मासिक
१२ डॉ. इंदिरा हिंदुजा मुंबई टेस्ट ट्युब बेबी प्रसूती करणाऱ्या स्त्रीरोग तज्ज्ञ
१३ तारा आनंद मुंबई भारतातील महिला योद्ध्यांचा डिजिटल आर्टद्वारे परिचय करून देणारी महिला कलाकार
१४ चंद्रानी प्रसाद वर्मा मूळच्या चंद्रपूरच्या पण नागपूरला स्थाईक सीएस आय आर नागपूर येथे प्रधान शास्त्रज्ञ
१५ दुर्गाबाई कामत (मरणोत्तर) भारतीय चित्रपट क्षेत्र-पहिल्या महिला नायिका
१६ डॉ. अबन मिस्त्री (मरणोत्तर) पहिल्या महिला तबलावादक

अन्य पुरस्कारात स्मशानघाटावर काम करणारी प्रथम महिला, पहिल्या महिला वैमानिक,लेफ्टनंट जनरल बनणारी प्रथम महिला, भारतीय सेनेज रुजू होणारी प्रथम महिला,पहिली महिला मर्चंट नेव्हीची कप्तान, अंटार्टिकाला पोचणारी प्रथम महिला आदिंचा समावेश आहे.