बोडखे
बोडखे हे एक मराठी आडनाव आहे. विदर्भात बोडखे तर पश्चिम महाराष्ट्र व पुणे परिसरात बोडके असे आडनाव आढळते. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील मनूर खुर्द गावात बोडखे आडनाव असणारे लोक आढळतात. हे लोक पाटील आडनाव सुद्धा लावतात. ह्यांचे पूर्वज म्हणजे चितोड गडचे राणा फत्तेसिंग. देवगिरीचे राजे रामदेवराय यादव ह्यांना परकीय शत्रूंनी वेढा घातला असता त्यांना लष्करी मदत देण्यासाठी आलेल्या सरदारांपैकी राणा फत्तेसिंग एक सरदार होते. दुर्दैवाने रामदेवराय यादव ह्यांचा पराभव झाला परंतु राजा रामदेवराय यादव ह्यांनी ह्या राजस्थानातून आलेल्या सरदारांना यथोचित वतनदाऱ्या देऊन महाराष्ट्रभूमीत त्यांना स्थान दिले. राणा फत्तेसिंग ह्यांच्या काही वंशजांना बुलढाणा जिल्ह्यातील लोणारची वतनदारी मिळाली. हे लोणारचे बोडखे म्हणून तिथे आजही ह्या आडनावाचे अनेक मराठा लोक आहेत.
विदर्भात बोडखे या आडनावाची लोक माळी, धनगर, कुणबी, बारी, महार या जातीमध्ये आहेत.
प्रसिद्ध व्यक्ती
डॉ. अमोल बळीराम पाटील (बोडखे):
संगणकीय रसायनशास्त्रातील तज्ञ. नवीन प्रकारचे रासायनिक बंध, Charge-shift bond [[१]], तसेच आयनिक द्रव (ionic liquids) संदर्भात संशोधन.