बोकारो
Appearance
(बोकारो स्टील सिटी या पानावरून पुनर्निर्देशित)
बोकारो ᱵᱚᱠᱟᱨᱚ |
|
भारतामधील शहर | |
बोकारो रेल्वे स्थानक |
|
देश | भारत |
राज्य | झारखंड |
जिल्हा | बोकारो जिल्हा |
क्षेत्रफळ | २८७ चौ. किमी (१११ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ७२८ फूट (२२२ मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | ४,१४,८२० |
- महानगर | ५,६३,४१७ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
बोकारो स्टील सिटी (संताली: ᱵᱚᱠᱟᱨᱚ) हे भारताच्या झारखंड राज्यातील एक औद्योगिक शहर आहे. बोकारो शहर झारखंडच्या पूर्व भागात पश्चिम बंगाल राज्यांच्या सीमेजवळ वसले आहे व ते राजधानी रांचीच्या ११० किमी ईशान्येस व धनबादच्या ३६ किमी पश्चिमेस स्थित आहे. २०११ साली बोकारोची लोकसंख्या सुमारे ४.१४ लाख होती.
बोकारो स्टील सिटीचे नाव येथील मोठ्या स्टीलच्या कारखान्यावरून पडले आहे. स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या ५ मुख्य स्टील कारखान्यांपैकी हा एक असून त्याची वार्षिक उत्पादन क्षमता ४.५ दशलक्ष टन इतकी आहे.
वाहतूक
[संपादन]बोकारो रेल्वे स्थानक दक्षिण पूर्व रेल्वेवरील रांची-दिल्ली मार्गावर स्थित असून येथे दररोज सुमारे ६६ गाड्या थांबतात. राष्ट्रीय महामार्ग २३ बोकारोमधूनच धावतो व राष्ट्रीय महामार्ग ३२ बोकारोला जमशेदपूरसोबत जोडतो.