बेल्जियन कॉमिक स्ट्रिप सेंटर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बेल्जियन कॉमिक स्ट्रिप सेंटर
Centre belge de la Bande dessinée  (French)
Belgisch Stripcentrum  (Dutch)
बेल्जियन कॉमिक स्ट्रिप सेंटरचे प्रवेशद्वार
बेल्जियन कॉमिक स्ट्रिप सेंटर is located in ब्रुसेल्स
बेल्जियन कॉमिक स्ट्रिप सेंटर
Location within ब्रुसेल्स
Established October 6, 1989[१]
Location Rue des Sables / Zandstraat 20,
B-1000 City of Brussels, Brussels-Capital Region, Belgium
Coordinates 50°51′04″N 4°21′36″E / 50.851111°N 4.36°E / 50.851111; 4.36
Type History of Belgian comics
Visitors More than 200,000 per year[१]
Public transit access Brussels-Central
Website www.comicscenter.net

बेल्जियन कॉमिक स्ट्रिप सेंटर (डच: Belgisch Stripcentrum) हे बेल्जियन कॉमिक्ससाठी समर्पित ब्रुसेल्समधील एक संग्रहालय आहे. हे २०, रु देस सेब्ल्स/ झॅन्डस्त्रात येथे आहे. ब्रुसेल्स-काँग्रेस रेल्वे स्टेशनद्वारे येथे जाणे शक्य आहे.

इमारतीचा इतिहास[संपादन]

या इमारतीची रचना १९०५ मध्ये जगप्रसिद्ध वास्तुविशारद व्हिक्टर होर्टा यांनी आर्ट नोव्यू शैलीमध्ये केली होती . या इमारतीचा वापर मॅगासिन वौक्वेझ या टेक्सटाईल डिपार्टमेंट स्टोअर म्हणून केला जात होता. १९२० मध्ये वॉक्झच्या मृत्यूनंतर, इमारतीचा वापर होत नव्हता.१९७० मध्ये, फर्मने आपले दरवाजे बंद केले. होर्टाचे माजी मदतनीस जीन डेल्हे यांनी इमारत पाडण्यापासून वाचवली आणि १६ ऑक्टोबर १९७५ पर्यंत ते संरक्षित स्मारक म्हणून नियुक्त केले गेले. तरीही, इमारत खराब अवस्थेत होती आणि बरीच तोडफोड झाली होती.[२]

१९८० मध्ये, वास्तुविशारद जीन ब्रेडेल आणि कॉमिक्स कलाकार फ्रँकोइस शुटेन, बॉब डी मूर, ॲलेन बारन, गाय डेसिसी आणि हर्गे यांनी इमारत पुनर्संचयित करण्याची योजना आखली. तसेच बेल्जियन कॉमिक्सच्या इतिहासाला समर्पित असणारे एक संग्रहालय तेथे बनवण्याची योजना आखली. मूलतः, संग्रहालय हे हर्गेला श्रद्धांजली देण्यासाठी बांधण्याचे ठरवेले होते, परंतु नंतर त्याने संपूर्ण बेल्जियन कॉमिक्स उद्योगाचा सन्मान करण्याचे सुचवले. १९८३ मध्ये, बेल्जियमचे सार्वजनिक बांधकाम मंत्री लुई ऑलिव्हियर यांनी निर्णय घेतला की ही इमारत इमारतींच्या दिशानिर्देशाद्वारे विकत घेतली जाईल. यामुळे ती राष्ट्रीय मालमत्ता होईल.[२] १९८४ मध्ये, एका फंडाची स्थापना करण्यात आली ज्याने अनेक फ्लेमिश आणि वालून कॉमिक्स कलाकारांना एकत्र आणण्यात मदत झाली. दोन वर्षांनंतर, मूळ आर्किटेक्चरच्या संदर्भात, आधुनिक मानकांमध्ये अद्ययावत करताना जीर्णोद्धार सुरू झाला. मोझीक पद्धतीचे बांधकाम करण्यासाठी कामगार इटलीमधून आणले होते आणि इटालियन मोज़ेक कामगारांनी बांधले. याचे कारण बेल्जियममध्ये हा व्यवसाय अप्रचलित झाला होता.[२]

६ ऑक्टोबर १९८९ रोजी, बेल्जियमचा राजा बॉडोइन आणि बेल्जियमची राणी फॅबिओला यांच्या उपस्थितीत संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले.[३]

२०१५ च्या शरद ऋतूमध्ये, संग्रहालयाने त्याच्या कायमस्वरूपी प्रदर्शनाची पुनर्रचना करण्यास सुरुवात केली.[४]

संग्रहालय[संपादन]

संग्रहालयाच्या तळमजल्यावर एक रेस्टॉरंट आहे. त्यात व्हिक्टर होर्टाला समर्पित एक खोली आहे. स्लंबरलँडमधील लिटिल निमोच्या नावावर "स्लंबरलँड" नावाचे कॉमिक्स स्टोअर आहे.[५] वाचन कक्ष आणि अभ्यास केंद्र असलेली लायब्ररी आहे. पहिल्या मजल्यावर ऑडिटोरियम आहे. विविध कलाकारांच्या मूळ कॉमिक बुक पेजेस असलेली खोली आणि ॲनिमेशनला समर्पित एक खोली, विशेषतः बेल्जियन ॲनिमेशन उद्योग, जसे की बेल्व्हिजन.[२]

दुसऱ्या मजल्यावर "कल्पना संग्रहालय" नावाचे बेल्जियममधील माध्यमाच्या कालक्रमानुसार इतिहासाला समर्पित कायमस्वरूपी प्रदर्शन आहे.[५] यातील मध्यमे एर्जेच्या कलाकृतींनी सुरुवात होते आणि पेयोच्या कलाकृतींनी समाप्त होतात. १९२९ व १९५८ च्या दरम्यान मासिके विशेषतः बेल्जियन कॉमिक्स होती, उदा स्पिरोउ आणि टिनटिन . प्रत्येक कलाकाराला त्याच्या कामासाठी समर्पित असलेली खोली आहे.[२][६]

अंतिम मजला कॉमिक्सच्या व्यापारासाठी समर्पित आहे आणि तात्पुरत्या प्रदर्शनांसाठी उपलब्ध आहे.[२]

प्रदर्शित कॉमिक्स कलाकारांची यादी[संपादन]

यात चार कलाकार फ्लेमिश आहेत: विली वँडरस्टीन, मार्क स्लीन, बॉब डी मूर आणि मॉरिस . जॅक मार्टिन आणि तिबेट (कॉमिक्स) वगळता बाकीचे कलाकार वालून भागातून आहेत. ते फ्रान्समध्ये जन्मलेले, परंतु त्यांचे काम टिनटिनमध्ये प्रकाशित झाले होते.

 1. हर्गे - (द अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ टिनटिन, क्विक अँड फ्लुपके, जो, झेटे आणि जोको)
 2. जिजे - (स्पिरौ एट फॅन्टासिओ, जेरी स्प्रिंग)
 3. एडगर पी. जेकब्स - (ब्लेक आणि मॉर्टिमर)
 4. विली वँडरस्टीन - (सुस्के एन विस्के)
 5. मार्क स्लीन - (निरोचे साहस)
 6. मॉरिस टिलीक्स - (गिल जॉर्डन)
 7. बॉब डी मूर - (कोरी, डी स्कीप्सजॉन्जेन)
 8. आंद्रे फ्रँक्विन - (स्पिरौ एट फॅन्टासिओ, मार्सुपिलामी, गॅस्टन लागाफे, फ्रँक्विनचे शेवटचे हसणे)
 9. जॅक मार्टिन - (अ‍ॅलिक्सचे साहस)
 10. मॉरिस - (लकी ल्यूक)
 11. पॉल कुवेलियर - (कोरेन्टिन)
 12. व्हिक्टर हुबिनॉन - (बक डॅनी)
 13. तिबेट - (चिक बिल, रिक होचेट)
 14. रेमंड मॅचेरोट - (क्लोरोफिल, सिबिलीन)
 15. जीन रोबा - (बोल एट बिल)
 16. पेयो - (जोहान आणि पीविट, द स्मर्फ्स)

मार्क स्लीन म्युझियम[संपादन]

स.न. २००९ पासून त्याच रस्त्यावर अजून एक कॉमिक्स-थीम असलेले संग्रहालय सुरू झाले आहे. ते बेल्जियन कॉमिक्स संग्रहालयाच्या समोरच आहे. याचे नाव मार्क स्लीन म्युझियम आहे. ते बेल्जियन कॉमिक्स कलाकार मार्क स्लीन याच्या कार्याला समर्पित आहे.

गॅलरी[संपादन]

हे देखील पहा[संपादन]

 • ब्रुसेल्स कॉमिक बुक मार्ग
 • बिली आयर्लंड कार्टून लायब्ररी आणि संग्रहालय
 • फ्रेड वारिंग कार्टून संग्रह
 • मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी कॉमिक आर्ट कलेक्शन
 • कॉमिक आणि कार्टून कला संग्रहालय

संदर्भ[संपादन]

 1. ^ a b "About Us—In Short". Brussels, Belgium: Belgian Comic Strip Center. 4 July 2011 रोजी पाहिले.
 2. ^ a b c d e f "Belgisch Centrum van het Beeldverhaal Brussel" [Belgian Comic Strip Center Brussels] (PDF). Openbaar Kunstbezit Vlaanderen (डच भाषेत). Archived from the original (PDF) on 2015-12-22. 2021-12-09 रोजी पाहिले.
 3. ^ "Belgian Comic Strip Center". City of Brussels. Archived from the original on 24 September 2014. 21 September 2014 रोजी पाहिले.
 4. ^ "De Hergéruimte" [The Hergé Room]. Stripmuseum Brussel (डच भाषेत). Archived from the original on 2021-04-11. 2021-12-09 रोजी पाहिले.
 5. ^ a b "Belgian Comic Strip Center". Brussels' Museums. Archived from the original on 19 September 2015. 7 November 2015 रोजी पाहिले.
 6. ^ "Drawing room: The Belgian Comic Strip Center: Tintin". The Independent. 15 October 2011. 22 December 2012 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]