बेतिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बेतियाचे नकाशावरील स्थान

बेतिया
भारतामधील शहर


बेतिया is located in बिहार
बेतिया
बेतिया
बेतियाचे बिहारमधील स्थान

गुणक: 26°48′8″N 84°29′55″E / 26.80222°N 84.49861°E / 26.80222; 84.49861

देश भारत ध्वज भारत
राज्य बिहार
जिल्हा पश्चिम चंपारण
क्षेत्रफळ २४ चौ. किमी (९.३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २१३ फूट (६५ मी)
लोकसंख्या  (२०२०)
  - शहर ३,०९,३७९
अधिकृत भाषा भोजपुरी
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३० (भारतीय प्रमाणवेळ)


बेतिया हे भारताच्या बिहार राज्याच्या पश्चिम चंपारण ह्याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख शहर आहे. बेतिया बिहारच्या वायव्य भागात भारत-नेपाळ सीमेजवळ व गंडकी नदीच्या काठाजवळ वसले आहे.

१३व्या शतकात भूमिहार ब्राह्मणांनी वसवलेले बेतिया शहर अनेक दशके येथील बेतिया राज नावाच्या घराणेशाही व जमीनदारीसाठी ओळखले जात असे. हरेंद्र किशोर सिंह हा बेतिया राज्याचा शेवटचा जमीनदार होता. बेतिया घराणे आपल्या संगीतामधील रूचीसाठी देखील ओळखले जात असे. येथे अनेक ध्रुपद गायक वसले होते.

आजच्या घडीला बेतिया हे बिहारमधील १४व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. २०२० साली बेतियाची लोकसंख्या सुमारे ३ लाख होती.