बेजान दारूवाला
बेजान दारूवाला (Bejan Daruwala) | |
---|---|
जन्म |
११ जुलै १९३१ अहमदाबाद, गुजरात, भारत. |
मृत्यू |
२९ मे, २०२० (वय ८८) मुंबई, महाराष्ट्र, भारत |
पेशा | ज्योतिषी |
धर्म | पारशी |
बेजान दारूवाला (११ जुलै, १९३१:अहमदाबाद, गुजरात - २९ मे, २०२०:मुंबई, महाराष्ट्र) हे भारतीय ज्योतिषी होते. यांचा जन्म पारशी परिवारात झाला होता. त्यांचे वडील एका मिलमध्ये काम करत होते. बेजान दारूवाला यांचं प्राथमिक शिक्षण हे अहमदाबादमध्ये पूर्ण झाले आणि त्यानंतर त्यांनी इंग्लिशचे प्राध्यापक म्हणून काम केले. देशातील अनेक टीव्ही चॅनल्स आणि वृत्तपत्रात त्यांनी सांगितलेले भविष्य प्रसारित होत होते.[१]
प्रसिद्ध भविष्यवेत्ता[संपादन]
दारुवाला हे स्वयंभू गणेश भक्त होते. त्यांनी भारताच्या पंतप्रधान पदावरून भविष्यवाणी केली होती. अटलबिहारी वाजपेयी, मोरारजी देसाई आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याचे भाकित त्यांनी केले होते.[२] याशिवाय त्यांनी राजीव गांधी यांची हत्या, संजय गांधी यांचा अपघात, भोपाळ गॅस दुर्घटनेवरही भविष्यवाणी केली होती.[ संदर्भ हवा ] दारूवाला यांनी २५ एप्रिल २००३ रोजी ज्योतिष वेबसाइटचा शुभारंभ मुंबईतील ताज हॉटेलमध्ये केला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या जोतिषी सेवेची सुरूवात त्यांनी आपल्या वेबसाईटवरुन केली. त्यांच्या वेबसाइटचं नाव बेजानदारूवाला.कॉम असं आहे.
मृत्यू[संपादन]
२९ मे २०२० रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दारुवाला यांचा मुलगा नास्तुर दारुवाला यांनी बेजान दारुवाला यांचा मृत्यू न्यूमोनिया आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झाला असे सांगितले. दारुवाला यांच्यावर अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.[१][२]
संदर्भ[संपादन]
- ^ "प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचं निधन". www.timesnowmarathi.com. 2020-05-29. 2020-05-29 रोजी पाहिले.
- ^ टाइम्सनाउ मराठी https://www.timesnowmarathi.com/india-news-international/article/astrologer-bejan-daruwala-passes-away-gujarat/295745. Missing or empty
|title=
(सहाय्य)