व्हेंटिलेटर
असे उपकरण जे रुग्णाच्या फुफ्फुसांना यांत्रिक वायुवीजन प्रदान करते | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
उपवर्ग | medical equipment, medical device, यंत्र, वैयक्तिक संरक्षणासाठीची उपकरणे | ||
---|---|---|---|
वापर |
| ||
पासून वेगळे आहे |
| ||
| |||
व्हेंटिलेटर हे एक यंत्र आहे जे यांत्रिक वायुवीजनाद्वारे (मेकॅॅनिकल व्हेंटिलेशन) श्वसनयोग्य वायूंचं मिश्रण फुफ्फुसांत पाठवून आणि उच्छवासित वायू बाहेर शोषून श्वास घेण्यास असमर्थ असलेल्या एखाद्या रुग्णाला कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्याकरिता सहाय्य करतात. आधुनिक व्हेेंटिलेटर हे संगणकीकृत मायक्रोप्रोसेसर-नियंत्रित आहेत. पण रूग्णांना साध्या बॅग व्हॅल्व मास्कच्या सहाय्याने सुद्धा कृृत्रिम श्वासोच्छवास देता येतो. व्हेंटिलेटर हे मुख्यत्वेे अतिदक्षता विभाग, होम केर आणि अपघात - आपत्कालीन विभागात आणि भूलशास्त्र विभागात (भूल यंंत्राचा एक घटक ) वापरले जातात.
व्हेंटिलेटरना कधीकधी "रेस्पिरेटर्स" असंही म्हणले जाते. १९५० च्या सुमारास त्यांना (बर्ड रेस्पिरेटर्स) असे संबोधले जाई, सदरचे नाव फॉरेस्ट बर्ड हे त्याच्या संशोधकाच्या नावावरून देण्यात आले आहे.
निर्माता | देश | बाजाराचा वाटा (2019) |
---|---|---|
गेटिंज | स्वीडन | 22% |
हॅमिल्टन मेडिकल | यूएसए, स्वित्झर्लंड | 22% |
ड्रॉगर | जर्मनी | १%% |
माइंड्रे | चीन | 10% |
मेडट्रॉनिक | आयर्लंड, यूएसए | 5% |
Löwenstein वैद्यकीय | जर्मनी | 3% |
व्यायरे मेडिकल | संयुक्त राज्य | 3% |
जीई हेल्थकेर | संयुक्त राज्य | 3% |
फिलिप्स रेस्पिरॉनिक्स | नेदरलँड्स | 3% |
इतर | 15% |
२०२० कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळं सॅनिटायझर, मास्क रूग्णालयतील खाटा आणि व्हेंटिलेटर यांच्या प्रचंड वाढलेल्या मागणीनं मर्यादित साठ्यामुळे पुरवठ्यात तूट निर्माण झाली आहे.
२००६ मध्ये (राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या अंमलात) अमेरिकेच्या बायोमेडिकल अॅडव्हान्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट अथॉरिटी (बार्डा)ला उमगले की देशात श्वसनाचा साथीचा रोग येणार आहे आणि त्याकरता अधिक व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे, म्हणून त्यांनी सहा दक्षलक्ष डॉलर्सची गंगाजळी कॅलिफोर्नियामधील न्यूपोर्ट मेडिकल इन्स्ट्रुमेंट्स या लघु क्षमता असलेल्या कंपनीला बहाल केली. ३,००० डॉलर्सपेक्षा कमी मूल्य प्रतिनग अशा हिशेबात ४०,००० व्हेंटिलेटर बनविण्याचा करार करण्यात आला. २०११ मध्ये, न्यूपोर्टने सेंटर ऑफ डिसिझ कंट्रोलला नमुने पाठविले. २०१२ मध्ये, कोविडीयन, १२ अब्ज डॉलर्स इतकी वार्षिक उलाढाल करणारऱ्या वैद्यकीय उपकरण उत्पादकानं, महाग स्पर्धात्मक व्हेंटिलेटर उत्पादित केले होते, त्यांनी न्यूपोर्टला १०० दशलक्ष डॉलर्समध्ये खरेदी केले. कोविडीयनने बार्डा बरोबरच्या करारात विलंब केला आणि २०१४ मध्ये करार रद्द केला.
बार्डाने पुन्हा नव्या कंपनीसोबत या उपक्रमाला सुरुवात केली आणि जुलै २०१९ मध्ये एफडीएने फिलिप्स व्हेन्टिलेटरला मंजूरी दिली आणि २०२० च्या मध्यात १०,००० व्हेंटिलेटर पुरवण्याची मागणी सरकारने केली.
२३ एप्रिल, २०२० रोजी, नासाने अवघ्या ३७ दिवसांत, एक यशस्वी कोविड -१९ व्हेंटिलेटर बनवून मैलाचा दगड गाठला. (ज्याचे नाव VITAL म्हणजे 'व्हेंटीलेटर इंटरव्हेंशन टेक्नॉलॉजी अॅक्सेसीबल लोकली' आहे) ज्याची सध्या पुढील चाचणी चालू आहे. नासानं एफडीएकडून सदर नमुन्याला जलदगती परवानगी देण्याची मागणी केली आहे.
आयआयटी रुर्कीने कमी किंमतीचे पोर्टेबल व्हेंटिलेटर विकसित केले आहे हा कोविड१९(कोर्चिकाया) रुग्णांसाठी उपयु्हक ठरू शकते. ‘प्राण-वायु’ नावाचे, क्लोज-लूप व्हेंटिलेटर एम्स, हृषिकेश यांच्या सहकार्याने विकसित केले गेले आहे आणि हे अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे.
'प्राण-वायु' सीआयआयने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये ४५०हून अधिक उद्योगांना सादर करण्यात आले आहे. या नमुन्याच्या घाऊक उत्पादनासाठीअनेक उद्योजकांनी स्वारस्य दाखविले आहे.
व्हेंटिलेटरचे कार्यरूप (फंक्शन)
सोप्या शब्दात आधुनिक पॉझिटिव्ह प्रेशर व्हेंटिलेटरमध्ये संपिडीतहवा किंवा टर्बाइन, हवा आणि ऑक्सिजन पुरवठा करणारी यंत्रणा, झडप (व्हॅल्व) आणि नळ्या यांचा संच आणि एकदा वापरता येणारा किंवा पुर्नवापर करता येणारं "रुग्ण सर्किट" असते. खोलीतील हवेसारखा पुरवठा रूग्णाला करण्यासाठी वायूभंडार (एर रिझर्व्हवॉयर) दर मिनिटाला अनेकदा वायवीय रित्या (न्यूमॅटिकली) संपिडीत (कंप्रेस) केले जाते. बऱ्याचदा हवा आणि ऑक्सिजनचे मिश्रण रूग्णांना देण्यात येते. जर टर्बाइन वापरली असेल तर टर्बाइन व्हेंटिलेटरद्वारे हवा ढकलते एक हवेच्या प्रवाहाच्या झडपेद्वारे (फ्लो व्हॅल्व) रूग्ण-विशिष्ट प्रमापक (पॅरामीटर्स) साध्य करण्यासाठी दबाव समायोजित (अॅडजस्ट) केला जातो. जेव्हा अतिरिक्त दाब सोडण्यात येतो तेव्हा फुफ्फुसांच्या लवचिकतेमुळे रुग्ण निष्क्रीयतेने श्वास बाहेर टाकतो. श्वासोच्छ्वास घेणारी हवा सहसा रूग्णाच्या सर्किटमधील एकतर्फी झडपीद्वारे सोडली जाते ज्याला रूग्ण मॅनिफोल्ड म्हणतात. काही व्हेंटीलेटर्स रुग्णांशी संबंधित प्रमापक (उदा. दबाव, व्हॉल्यूम आणि प्रवाह) आणि व्हेंटिलेटर फंक्शन (उदा. हवा गळती, पॉवर फेल्युअर, मेकॅनिकल फेल्युअर, बॅकअप बॅटरी, ऑक्सिजन टाक्या आणि रिमोट कंट्रोल) यावर देखरेख अधिक्षण आणि गजर (मॉनिटर अॅण्ड अलार्म) प्रणालीचे सुसज्ज असतात. ही वायवीय प्रणाली आजकाल बहुतांश व्हेंटिलेटर मध्ये संगणकाद्वारे नियंत्रित टर्बोपंपद्वारे बदलली गेली आहे.
आधुनिक व्हेंटिलेटर इलेक्ट्रॉनिक रित्या एका छोट्या एम्बेडेड सिस्टमद्वारे नियंत्रित केले जातात, जेणेकरून एखाद्या रुग्णाच्या गरजेनुसार दाब आणि प्रवाह वैशिष्ट्यांचे अचूक समायोजन केले जाते. सानुकूलित व्हेंटिलेटर सेटिंग्ज कृत्रिम श्वासोच्छ्वासाची प्रक्रिया रूग्णासाठी अधिक सहनशील आणि आरामदायक बनवतात.
कॅनडा आणि अमेरिकेत भारतात, रेस्पिरेटरी थेरपिस्ट या सेटिंग्ज सानूकूल करण्यासाठी जबाबदार आहेत, तर बायोमेडिकल तंत्रज्ञ/अभियंते त्यांच्या देखभालीसाठी जबाबदार आहेत. युनायटेड किंग्डम आणि युरोपमध्ये व्हेंटिलेटरसह रुग्णाच्या परस्परकार्याचे व्यवस्थापन अतिदक्षता विभागातील नर्सद्वारे केले जाते.
रूग्ण सर्किटमध्ये सहसा तीन टिकाऊ, परंतु कमी वजनाच्या प्लास्टिक ट्यूब असतात, त्यातील प्रत्येकाचे कार्य वेगवेगळे (उदा. इनहेल्ड एर, पेशंट प्रेशर, एम्लाईड एर) असते. रूग्णाला आवश्यक वायुवीजन प्रकाराद्वारे निश्चित केले जाते की, सर्किटचा रुग्णाकडची जोडणी नॉनइन्वेझिव्ह किंवा इन्वेझिव्ह असेल.
कंटिन्युअस पॉझिटिव्ह एरवे प्रेशर (सीपीएपी) आणि नॉनइन्वेझिव्ह व्हेंटिलेशन यासारख्या नॉनवाइझिव्ह पद्धती, ज्या रुग्णांना झोप आणि विश्रांती घेताना फक्त व्हेंटिलेटरची आवश्यकता असते अशा मध्ये प्रामुख्याने अनुनासिक मुखवटा लावून (नेजल मास्क) वापरल्या जातात. इन्वेझिव्ह पद्धतीत घशात नळ्या घालण्याची आवश्यकता असते, जी दीर्घकालीन वेंटिलेटरच्या वापरासाठी सामान्यत: ट्रेकीओटोमी कॅन्युला म्हणून ओळखली जाते. कारण ही कॅन्युला, स्वरयंत्र किंवा अनुनासिक भागात नळ्या घालण्यापेक्षा दीर्घकालीन वापरासाठी अधिक सोयीस्कर आणि व्यावहारिक आहे.