बुर सैद स्टेडियम संघर्ष
Appearance
पोर्ट सैद स्टेडियम संघर्ष हा १ फेब्रुवारी २०१२ रोजी इजिप्शियन प्रीमियर लीगच्या अल-मसरै आणि अल-अल्हय क्लब्स दरम्यानच्या सामन्यादरम्यान पोर्ट सैद फुटबॉल स्टेडियम, इजिप्त येथे उफाळून आला. अल-मसरै संघाला पाठींबा असणाऱ्या प्रेक्षकांनी अल-अल्हय संघाला पाठींबा असलेल्या प्रेक्षकांवर, तसेच क्लबच्या खेळाडूंवर चाकू, तलवारी, दगड, बाटल्या, फटके इत्यादींनी हल्ला चढवला. यात सुमारे ७९ जणांचा मृत्यू झाला व जवळपास १००० व्यक्ती जखमी झाले.