बी. प्रभा
Appearance
बी. प्रभा | |
जन्म | १९३३ |
मृत्यू | सप्टेंबर २०, २००१ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | चित्रकला |
प्रशिक्षण | जे.जे. स्कूल ऑफ आर्ट |
बी. प्रभा (१९३३ - सप्टेंबर २०, २००१) ही भारतीय चित्रकर्ती होती.
जीवन
[संपादन]बी. प्रभा हिचा जन्म नागपुराजवळील बेला नावाच्या खेड्यात १९३३ साली झाला. त्यांचे चित्रकलेचे प्रशिक्षण नागपुरातील नागपूर स्कूल ऑफ आर्ट व मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथे झाले.
१९५६ साली त्या चित्रकार-शिल्पकार बी. विठ्ठल यांच्याबरोबर विवाहबद्ध झा्ल्या.
तैलरंगांतील चित्रांबद्दल त्यांची ख्याती होती. ग्रामीण भारतातील बायकांच्या जीवनावर, राहणीमानावर त्यांनी चितारलेली चित्रे त्यांची वैशिष्ट्यपूर्ण ओळख मानली जातात.
सप्टेंबर २०, २००१ रोजी त्यांचे निधन झाले.
बाह्य दुवे
[संपादन]- 'इंडियनाअर्टकलेक्टर्स.कॉम'वरील बी. प्रभा यांची चित्रे Archived 2008-09-28 at the Wayback Machine.