बिन्नी यांगा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बिन्नी यांगा (७ जुलै, १९५८:अरुणाचल प्रदेश, भारत - ३ सप्टेंबर, २०१५:गुवाहाटी, असम, भारत) या भारतीय समाजसेविका होत्या.

यांगा भारतीय योजना समितीच्या सदस्या होत्या व ओजू वेलफेर असोसियेशन या समाजसेवी संस्थेच्या संपादिका होत्या. आपल्या संस्थे द्वारे त्यांनी बालविवाह, जबरदस्तीने केलेले विवाह आणि हुंड्याच्या पद्धतींविरुद्ध काम केले.

यांगांनी १९७९मध्ये एक प्रौढ शिक्षण संस्था आणि बालसंगोपन केन्द्र तसेच परागंदा मुलींसाठी आश्रम सुरू केले. १९८७मध्ये त्या अरुणाचल प्रदेश पोलिस दलात पहिल्या महिला अधिकारी दलासह शामिल झाल्या. १९८८मध्ये त्यांनी तेथून राजीनामा देउन पूर्ण वेळ समाजसेवेला देणे सुरू केले.

यांगा यांचा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने मृत्यू झाला.