बाव नदी
Appearance
बाव | |
---|---|
उगम | सह्याद्री पर्वत, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र |
मुख | रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड, अरबी समुद्र |
पाणलोट क्षेत्रामधील देश | भारत, महाराष्ट्र |
ह्या नदीस मिळते | शास्त्री |
बाव नदी ही महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक महत्त्वाची पश्चिमवाहिनी नदी आहे. तसेच ही शास्त्री नदीची उपनदी आहे. ही नदी संगमेश्वर आणि रत्नागिरी या दोन तालुक्यांतून वाहते.
उगम
[संपादन]बाव नदीचा उगम हा मार्लेश्वर जवळ सह्याद्री डोंगरात होतो. या नदीचे दोन प्रवाह आहेत. त्यातील एक प्रवाह हा आंबा घाटाच्या उत्तरेकडे उगम पावतो. हा प्रवाह हा मुख्य प्रवाह आहे. दुसरा प्रवाह हा मार्लेश्वर जवळील कुंडी गावाजवळ उगम पावतो. हे दोन्ही प्रवाह संगमेश्वर तालुक्यातील हातीव आणि मुरादपूर गावाजवळ एकत्र येऊन बाव नदी या नावाने पुढे वाहतात.
उपनद्या
[संपादन]सप्तलिंगी नदी ही बाव नदीची एक उपनदी आहे.
मुख
[संपादन]बाव नदी ही थेट समुद्राला जाऊन मिळत नाही. ही नदी शास्त्री नदीला जाऊन मिळते. आणि पुढे शास्त्री नदी ही रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे अरबी समुद्राला मिळून जयगडची खाडी तयार होते.