Jump to content

बाळ कर्वे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Bal Karve (es); Bal Karve (sw); Bal Karve (nl); बाळ कर्वे (mr); బాల్ కర్వే (te); ବାଳ କର୍ବେ (or); Bal Karve (sq); Bal Karve (ast); Bal Karve (en) actor indio (es); ভারতীয় অভিনেতা (bn); acteur indien (fr); India näitleja (et); actor indio (gl); שחקן הודי (he); acteur (nl); actor indi (ca); Indian actor (en); actor indian (ro); ଭାରତୀୟ ଅଭିନେତା (or); aktor indian (sq); ممثل هندي (ar); Indian actor (en); indijski glumac (hr)
बाळ कर्वे 
Indian actor
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखऑगस्ट २५, इ.स. १९३० (most precise value)
पुणे
मृत्यू तारीखऑगस्ट २८, इ.स. २०२५
मुंबई
व्यवसाय
अधिकार नियंत्रण
कलाकार मराठी

बाळ कर्वे (जन्म : २५ ऑगस्ट १९३९ – २८ ऑगस्ट २०२५) हे मराठी नाट्य आणि चित्रपटअभिनेते होते. यांनी केलेली दूरदर्शनवर चिमणराव-गुंड्याभाऊ मालिकेत केलेली गुंड्याभाऊची भूमिका खूप प्रसिद्ध झाली होती. ही मालिका १९७९ साली आली होती.

कर्वे कुटंबीय पुण्याचे. त्यांचे शालेय, महाविद्यालयीन आणि पुढील अभियांत्रिकी पदवी शिक्षण पुण्यातच झाले. बाळ कर्वे यांचे खरे नाव ‘बाळकृष्ण’. पण पूर्ण नाव घेण्याऐवजी नुसतेच ‘बाळ’ म्हणू लागले आणि पुढे हेच नाव रूढ झाले. ‘कॉलेज ऑफ इंजिनीअिरग पुणे’ येथून ते ‘स्थापत्य अभियंता’ झाले. त्यानंतर ते मुंबई महानगरपालिकेत स्थापत्य अभियंता म्हणून नोकरीला लागले. त्यांनी बत्तीस वर्षे नोकरी केली. नोकरीच्या निमित्ताने ते मुंबईत पार्ल्यात एका नातेवाईकाकडे राहात. त्याच ‌इमारतीत सुमंत वरणगांवकर राहायचे. ते रंगभूमीशी संबंधित होते. नाटकाची आवड असल्यामुळे त्यांची मैत्री झाली आणि दोघांनी मिळून ‘किलबिल बालरंगमंच’ अशी छोटीशी संस्था स्थापन केलीआणि त्तिच्यासाठी ते बालनाट्ये बसवू लागले.

रंगकर्मी विजया मेहता या बाळकर्व्यांच्या नाट्य क्षेत्रातील गुरू. अभिनेते माधव वाटवे हे त्यांचे शेजारी. विलेपार्ले येथे एकाच सहकारी गृहनिर्माण संस्थेत ते राहायचे. साहित्य संघात ‘नाटककाराच्या शोधात सहा पात्रे’ या नाटकाचा प्रयोग होता. त्या प्रयोगाला वाटवे हे कर्वे यांना घेऊन गेले होते. तेथे ‘रंगायन’ची अनेक मंडळी होती. पुढे कर्वे यांनी ‘रंगायन’मध्ये प्रवेश केला. यातून ‘लोभ नसावा ही विनंती’ हे विजय तेंडुलकर यांचे नाटक त्यांनी राज्य नाटय़ स्पर्धेसाठी केले. नाटकाला पारितोषिकही मिळाले.

‘रंगायन’च्या ‘अजब न्याय वर्तुळाचा’या नाटकाचे प्रयोग जर्मनी येथे झाले. त्या दौऱ्यात प्रयोगाच्या वेळी ‘सेट’चे सर्व काम कर्वे यांनी पाहिले. विमानातून नेता येतील, असा घडीचा सेट त्यांनी तयार केला होता. यातून पुढे ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘बॅरिस्टर’ आदी नाटकात बदली कलाकार म्हणूनही काम केले.

साहित्य संघाचे ‘संध्याछाया’ हे कर्वे यांचे पहिले व्यावसायिक नाटक. यात विजया मेहता आणि माधव वाटवे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यात छोटी भूमिका कर्वे यांच्या वाटय़ाला आली होती पण आपल्या अभिनय कौशल्याने त्यांनी त्या भूमिकेत असे काही रंग भरले की ती भूमिकाही प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. इथून पुढे कर्वे यांचा नाटय़प्रवास सुरू झाला.

'चिमणराव-गुंड्याभाऊ' ही भारतातील पहिली टीव्ही मालिका होती. तोपर्यंत टीव्हीवर मालिकांचा सिलसिला सुरू झालेला नव्हता. याकूब सईद आणि विजया जोगळेकर यांची ती संकल्पना होती. गुंड्याभाऊच्या भूमिकेसाठी शरद तळवलकरांचे नाव सुचविले होते, पण ते तेव्हा चित्रपटांमध्ये व्यस्त असल्याने त्यांनी कर्व्यांचे नाव सुचविले आणि अपघातानेच वाट्याला आलेल्या त्या भूमिकेने बाळ कर्वे महाराष्ट्रातल्या घराघरांत आणि मनामनांत पोहोचले.

अभियंता

[संपादन]

माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिराच्या डागडुजीचे व पुनर्बाधणीचे काम सुरू झाले तेव्हा कर्वे यांनी नाट्यगृहाची दुरुस्ती आणि फेररचना यात कर्वे यांनी मोलाचे योगदान दिले. हे सर्व काम त्यांनी कोणताही आर्थिक मोबदला न घेता निःशुल्क केले.

विश्वस्त

[संपादन]

बाळ कर्वे हे नाट्य परिषदेचे विश्वस्त म्हणूनही काम पाहत आहेत.

चित्रपट

[संपादन]

कर्वे यांनी दहा ते पंधरा मराठी चित्रपट केले. ‘जैत रे जैत’ हा त्यांचा पहिला चित्रपट. यात त्यांची अगदी लहान भूमिका होती. ‘बन्याबापू’ या चित्रपटात ते चक्क नायिकेबरोबर बागेत फिरताना आणि गाणे म्हणताना पडद्यावर दिसतात. सरला येवलेकर त्यांची नायिका होती. त्या दोघांवर चित्रित झालेले ‘प्रीतीचं झुळझुळ पाणी वाऱ्याची मंजूळ गाणी’ हे गाणे आजही लोकप्रिय आहे. बेळगाव येथील ‘पार्वती’ चित्रपटगृहात हा चित्रपट सलग १९ आठवडे चालला. बेळगावात मराठी चित्रपटाने केलेला तो विक्रम आहे.

दूरदर्शन

[संपादन]

दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या गजानन जहागीरदार दिग्दर्शित ‘स्वामी’ या मालिकेतील बाळ कर्वे यांनी साकारलेला ‘गंगोबा तात्या’ गाजला. खलनायक असलेल्या या पात्राच्या तोंडी असलेला ‘काय’ हा शब्दप्रयोग लोकप्रिय झाला. वीरेंद्र प्रधान याच्या आग्रहाखातर ‘उंच माझा झोका’ या मालिकेच्या एकाच भागात त्यांनी ‘गणेश शास्त्री’ ही वैद्यराजांची भूमिका रंगविली आणि त्या छोट्याशा भूमिकेतही ते छाप पाडून गेले.

नाटके

[संपादन]
  • अजब न्याय वर्तुळाचा
  • आई रिटायर होते (या नाटकातील भूमिकेसाठी बाळ कर्वे यांना राज्य शासनाचा ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ हा पुरस्कार मिळाला.)
  • आम्ही लटिकेना बोलू
  • कुसुम मनोहर लेले
  • तांदुळ निवडता निवडता
  • बॅरिस्टर (बदली कलाकार)
  • मनोमनी
  • रथचक्र
  • लोभ नसावा ही विनंती (राज्य नाट्य स्पर्धेसाठीचे नाटक)
  • सूर्याची पिल्ले
  • शांतता कोर्ट चालू आहे (बदली कलाकार)
  • संध्याछाया (पहिले व्यावसायिक नाटक)

चित्रपट

[संपादन]
  • गोडी गुलाबी (१९९१)
  • चटक चांदणी (१९८२)
  • चांदोबा चांदोबा भागलास का
  • जैत रे जैत
  • बन्याबापू
  • लपंडाव (१९९३)
  • सुंदरा सातारकर

दूरदर्शन मालिका

[संपादन]

पुरस्कार

[संपादन]

बाळ कर्वे यांना गुंड्याभाऊच्या भूमिकेसाठी महाराष्ट्र शासनाचे दोन पुरस्कार मिळाले.