बाळकृष्ण दत्तात्रेय शिरगावकर
Appearance
बाळकृष्ण दत्तात्रेय शिरगावकर | |
पूर्ण नाव | बाळकृष्ण दत्तात्रेय शिरगावकर |
जन्म | फेब्रुवारी ४, १९०९ कसबा तारळे, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू | जून १३, २००६ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | चित्रकला, अध्यापन (कला) |
बाळकृष्ण दत्तात्रेय शिरगावकर ऊर्फ बी.डी. शिरगावकर (फेब्रुवारी ४, १९०९ - जून १३, २००६) हे मराठी चित्रकार होते.
जीवन
[संपादन]शिरगावकरांचा जन्म फेब्रुवारी ४, १९०९ रोजी महाराष्ट्रातील कोल्हापुरानजीकच्या कसबा तारळे गावी झाला. १९३८ साली ते मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट य कलाशिक्षणसंस्थेत अध्यापक म्हणून रुजू झाले. बनारस हिंदू विश्वविद्यापीठाच्या संगीत व ललितकला शाखेच्या अभ्यासमंडळावर इ.स. १९५१ ते १९६८ सालांदरम्यान ते सदस्य म्हणून काम सांभाळत होते.
जून १३, २००६ रोजी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.