बारामोटेची विहीर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बारामोटेची विहीर म्हणजेच बारा मोटा असलेली विहीर ही एक वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेली ऐतिहासिक वास्तू सातारा जिल्ह्यात आहे. ह्या विहिरीतून पाणी उपसण्यासाठी एकावेळी १२ मोटा लावल्या जात.

स्थळ[संपादन]

राष्ट्रीय महामार्ग क्र.४ ने सातारा शहरापासून पुण्याकडे येण्याच्या रस्त्यावर साधारण १२ कि.मी वर लिंब फाटा लागतो आणि तेथून उजवीकडे आत गेल्यावर ३ कि.मी. वर लिंब गाव आहे. ह्या गावाच्या दक्षिणेला २ कि.मी. अंतरावरील शेरीची वाडी या ठिकाणी कृष्णा नदीच्या तीरावर ही बारामोटेची विहीर आहे.

स्थापना[संपादन]

शके १६४१ ते १६४६ या कालावधीत श्रीमंत सौ. विरुबाई भोसले ह्यांनी या विहिरीचे बांधकाम केले. [१]

स्थापत्य[संपादन]

विहिरीचा व्यास ५० फूट आणि खोली ११० फूट असून आकार अष्टकोनी आणि शिवलिंगाकृती आहे. येथे मोडी लीपीतील एक शिलालेख आहे. जमिनीखालील महालात ही विहीर आहे. महालाच्या मुख्य दरवाजावर कलाकुसर केलेली आहे. आतील बाजूस शरभाची दगडी मूर्ती आहे. महालात विविध चित्रे कोरली आहेत. विहिरीला प्रशस्त असा जिना आणि चोरवाटा आहेत. विहिरीवर १५ थारोळी आहेत. ह्या चोरावाटांतून वर आले की १२ मोटांची जागा, दरबाराची आणि सिंहासनाची जागा बघायला मिळते.

हि विहीर सुंदर स्थापत्यशास्त्र चे उत्तम उदाहरण आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ http://www.pudhari.com/news/satara/24610.html