बळवंतराव कृष्णाजी तांबे
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
तांबे हे मुळचे रत्नागिरीच्या गुढे गावातील. कृष्णाजी विष्णू राव तांबे यांचा जन्म १७१९ सालचा. ते धावडशी येथील ब्रम्हेंद्र स्वामींचे भक्त असल्याने स्वामींनी तांबेना सेवेत रुजू करून घेतले होते. मुळ पुरुषाची समाधी मंदिराच्या परिसरात आहे. प्रथम बाजीराव पेशव्यांच्या इच्छेप्रमाणे कृष्णाजी शस्रविद्या शिकले. १७३८ मध्ये बुंदेलखंड युद्धात त्यांनी सहभाग घेतला. बाजीरावांनी हमीरपूर आणि बांदाची सुभेदारी त्यांना दिली. काही काळाने ते पुन्हा पुणे येथील तांबे वाड्यात वास्तव्यास आले. १७६१ सालच्या पानिपत युद्धात मराठा सैन्याच्या बाजूने कृष्णाजी लढले.
कृष्णाजी यांना १७३८ साली उमरखेड येथे 'बळवंतराव' नावाचा पुत्र झाला. बळवंतराव युद्धकलेत पारंगत होते. १८१५ साली ते द्वितीय बाजीराव पेशवे बंधू चिमाजी अप्पा पेशव्यांसह पुण्याहून काशीला गेले. अस्सी घाट जवळच तांबे वाडा बांधला व तेथेच राहीले. बळवंतरावास मोरोपंत तांबे व 'सदाशिव तांबे' अशी दोन मुले झाली. १८३८ च्या सुमारास मोरोपंत आपली कन्या मनिकर्णिका, आणि नातेवाईक 'केशव भास्कर तांबे' सह बिठूरला गेले. आणि तिथेच वास्तव्यास राहीले. पुढे मनिकर्णिकेचा विवाह झांशी संस्थान अधिपती श्रीमंत गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला व झांशी दरबारात मोरोपंतांना मानाचे स्थान मिळाले. ते झांशीच्या मुरलीधर मंदिर आणि दुर्गाबाई वाड्यात राहत होते. १८४८ साली चिरगावच्या 'शिवराम खानवलकर' यांच्या कन्येशी विवाह झाला. 'चिमणाबाईचे' चिमणाबाई खानवलकर चिमनाबाई तांबे नाव 'यमुनाबाई' असे ठेवले. यमुनाबाई तांबे ह्या झांशी प्रजेच्या आईसाहेब होत्या. ह्या दोघांना चिंतामणी तांबे व गोपिकाबाई खेर नावाचे अपत्ये झाले. १८५७-५८ झांशी युद्धात आपल्या कन्येसह मोरोपंत ही इंग्रजांविरुद्ध लढले. १९ एप्रिल १८५८ रोजी झोखनबागेत त्यांना इंग्रजांनी फाशी दिली. यमुनाबाई आपल्या मुलांसह इंदूर येथे वास्तव्यास आल्या. आज ह्यानचे वंशज नागपूर आणि सातारा येथे आहे. तर मुळ भावकी रत्नागिरीत आहे.