चिंतामणी तांबे
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
- नाम : चिंतामणी मोरोपंत तांबे
- जन्म : १२ मार्च १८५६ झाँसी
- आई-वडील : मोरोपंत तांबे, यमुनाबाई तांबे
- बहिण : राणी लक्ष्मीबाई, गोपिकाबाई खेर
- पत्नी :- सरस्वतीबाई मुले
- अपत्ये :- गोविंदराव तांबे
- कन्या :- दुर्गाबाई तांबे
- मुळनिवासी :- रत्नागिरी
- रहिवासी :- इंदूर
- मृत्यु :- १९३२
मोरोपंत तांबे आणि त्यांची दुसरी पत्नी चिमनाबाई खानवलकर अर्थात यमुनाबाई तांबे यांना १२ मार्च १८५६ रोजी झांशी येथे चिंतामणी नावाचा मुलगा झाला. राणी लक्ष्मीबाई चिंतामणी यांना खुप स्नेह करीत. १८५८ एप्रिल मध्ये राणी लक्ष्मीबाई यांनी झांशी सोडल्यानंतर चिंतामणी आई यमुनाबाईसह गुरसराँय आणि नंतर इंदूरला आले.आईसह त्यांनी आयुष्यात खुप संघर्ष केला. त्यांचा विवाह मुळे कुटुंबीयांची कन्या सरस्वतीबाईंशी झाला. त्यांना गोविंदराव आणि दुर्गाबाई नावाचे अपत्य होते. १९२९-३० मध्ये चिंतामणी आणि त्यांचे मेव्हणे दिनकर विनायक मुळे यांच्या साह्याने १८६१ मध्ये रतन कुशवाह यांनी बनवलेले महाराणी लक्ष्मीबाई यांचे पहिले तैलचित्र शोधून जगासमोर आणले. ह्या चित्रात राणी लक्ष्मीबाई हातात ढाल व तलवार घेऊन मर्दाना पोषाखात आहेत. तसेच चिंतामणी यांचे पुत्र गोविंदराव तांबे यांनी लंडनमध्ये असलेल्या १८५० साली काढलेले महाराणीचे वधूवेश रूपातील मुळचित्राची माहीती गोळा करून महाराष्ट्रीय शैलीत दुसरे चित्र बनवले. हे चित्र सध्या रत्नागिरीच्या नेवाळकर व तांबेकडे आहे.