बर्लिन शोनेफेल्ड विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बर्लिन शोनेफेल्ड विमानतळ (आहसंवि: SXFआप्रविको: EDDB) जर्मनीची राजधानी बर्लिनजवळील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. बर्लिनच्या दक्षिणेस ब्रांडेनबुर्ग राज्यात शोनेफेल्ड शहरात असलेला हा विमानतळ टेगेल विमानतळापाठोपाठ बर्लिन महानगरातील दुसरा मोठा विमानतळ आहे.

जर्मनीचे एकत्रीकरण होण्याआधी शोनेफेल्ड विमानतळ पूर्व बर्लिनमध्ये होता. हा विमानतळ पूर्व जर्मनीचा मुख्य विमानतळ होता.

येथून युरोप आणि जगातील अनेक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे.