पूर्व बर्लिन
Appearance
पूर्व बर्लिन (जर्मन: Ostberlin) हा १९४९ ते १९९० दरम्यान अस्तित्वात असलेला बर्लिन ह्या शहराचा एक भाग होता (दुसरा भाग: पश्चिम बर्लिन). दुसऱ्या महायुद्धानंतर बर्लिन शहराचे चार हिस्से करण्यात आले, ज्यापैकी सर्वात मोठा व पूर्वेकडील हिस्सा सोव्हिएत संघाच्या ताब्यात राहिला. कालांतराने पूर्व बर्लिन ही पूर्व जर्मनी देशाची राजधानी घोषित करण्यात आली.
१३ ऑगस्ट १९६१ ते ९ नोव्हेंबर १९८९ दरम्यान पूर्व बर्लिन व पश्चिम बर्लिन हे भाग बर्लिनच्या भिंतीने विभाजले गेले होते. १९९० साली जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर बर्लिन शहर पुन्हा एकसंध बनले.