बनास नदी (राजस्थान)
river in India | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| प्रकार | नदी | ||
|---|---|---|---|
| स्थान | राजस्थान, भारत | ||
| लांबी |
| ||
| नदीचे मुख | |||
| Drainage basin |
| ||
![]() | |||
| |||
बनास नदी ही राजस्थानमध्ये अरवली पर्वतात उगम पावतात. ही चंबळ नदीला मिळते व चंबळ पुढे यमुना नदीला मिळते.[१]
ही नदी राजस्थानातल्या उदयपूर जिल्ह्यातील अरवली पर्वत रांगेच्या खमनौर डोंगरात कुंभलगडजवळ उगम पावून राजस्थानातच संपते. हिची एकूण लांबी ४८० किमी आहे. नाथद्वारा, कंकरोली, राजसामंद व भिलवाडा जिल्ह्यातून वहात वहात ती टोंक, सवाई माधोपूर करून चंबळ नदीला मिळते. बनास म्हणजे बन+आस, म्हणजे वनाची आशा.[२]
उपनद्या
[संपादन]कोठारी नदी ही या बनासची उपनदी आहे, तीही राजस्थानमधील देवैर गावाजवळ उगम पावते. मांडलगड गावाजवळ तिचा बनासशी संगम होतो.
खारी नदीही त्याच बनासची उपनदी असून बेदल गावाजवळ उगम पावते. अजमेर जिल्ह्यात सावर गावाजवळ ती बनासला मिळते.
दाई नदी ही बनासची तिसरी उपनदी आहे; राजस्थानच्या उनिवारा खुर्द गावाजवळ उगम पावून तिचा बिलासपूर गावापाशी बनासशी संगम होतो.
बेडच, मुरेल व धुंध याही बनासच्या उपनद्या आहेत.
संदर्भ
[संपादन]- ^ "Rivers - Banas Basin". Department of Water Resources, Government of Rajasthan. 25 March 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 April 2013 रोजी पाहिले.
- ^ Jain, S. Sharad Kumar (2007). Hydrology and water resources of India. The Netherlands: Springer. pp. 352, 353. ISBN 9781402051807.
