फ्योदर दस्तयेवस्की
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
फ्योदर दस्तयेवस्की | |
---|---|
![]() दस्तयेवस्कीचे प्रकाशचित्र (१८७९ | |
जन्म नाव | फ्योदर मिखालोविच दस्तयेवस्की |
जन्म |
नोव्हेंबर ११, १८२१ मॉस्को |
मृत्यू |
फेब्रुवारी ९, १८८१ सेंट पीटर्सबर्ग |
राष्ट्रीयत्व |
रशियन ![]() |
कार्यक्षेत्र | कादंबरीकार |
साहित्य प्रकार | कादंबरी |
कार्यकाळ | १९ वे शतक |
प्रसिद्ध साहित्यकृती | क्राईम ॲंड पनिशमेंट, द ब्रदर्स करमाझोव्ह, द इडियट |
प्रभाव | अलेक्सांद्र पुश्किन, व्हिक्टर ह्युगो |
प्रभावित | फ्रांत्स काफ्का, फ्रीडरिश नित्शे, अर्नेस्ट हेमिंग्वे, आयन रॅंड, सिग्मंड फ्रॉइड, अलेक्सांद्र सोल्झेनित्सिन |
वडील | मिखाईल |
आई | मारीया |
पत्नी | मारीया इसायेवा |
रशियन लेखक फ्योदर मिखालोविच दस्तयेवस्की (११ नोव्हेंबर १८२१ - ९ फेब्रुवारी १८८१) हे आपल्या क्राईम ॲंड पनिशमेंट (गुन्हा आणि शिक्षा) या कादंबरीसाठी ओळखले जातात. त्यातील पात्रे तीव्र भावना असणारी, गुन्ह्यातून वाट शोधणारी, स्वातंत्र्याचा अर्थ शोधणारी, तात्त्विक प्रश्न मांडणारी असल्याने दस्तयेवस्की हे जगभरातील सामान्य लोकांचे प्रतिनिधीत्व करणारे लेखक ठरतात. त्यांच्या पुस्तकांचे अनेक भाषांमध्ये भाषांतरे झालेली आहेत.
त्यांनी त्यांचे लिखान विसावित सुरू केले, आणि त्यांची पहिली कादंबरी, पूअर फोक (गरीब लोक) ही 1846 मध्ये प्रकाशीत केली तेव्हा त्यांचे वय 25 होते.
बालपण, शिक्षण[संपादन]
फ्योदर हे वडील मिखाईल आणि आई मारीया यांच्या सहा मुलांपैकी दुसरे अपत्य. वडील मिखाईल हे एक सर्जन होते, मॉस्को शहरातील गरिबांसाठी चालविण्यात येणाऱ्या इस्पितळात ते काम करीत असत. फ्योदरला लहानपणी त्या इस्पितळातील गरीब रुग्णांच्या गोष्टी ऐकण्यात स्वारस्य असल्याने ते तेथील लोकांची चौकशी करीत, त्यांच्याजवळ बसून त्यांच्याविषयी जाणून घेत.
आई मारीयाचे निधन झाल्यावर (१८३७) फ्योदर आणि त्यांच्या भावाला शिक्षणासाठी सेंट पीटर्सबर्ग येथील Military Engineering Academy मध्ये पाठविण्यात आले. लवकरच (१८३९) वडील मिखाईल यांचेही निधन जाले. आपले Military Engineering Academy मधील शिक्षण पूर्ण (१८४२) करून फ्योदर दस्तयेवस्की लेफ्टनंट पदावर सैन्यात दाखल झाले. सैन्यात सुमारे २ वर्षे नोकरी करून दस्तयेवस्कीने ती नोकरी सोडून दिली आणि ते गंभीरपणे लिखाणाकडे वळले.
तुरुंगवास[संपादन]
सैन्यातून निवृत्ती पत्करून दस्तयेवस्की एका बंडखोर गटाचे सदस्य झाले. त्या गटासाठी जहाल मतांची पत्रके काढून त्यांनी ती वाटल्याने १८४९ साली त्यांना अटक करण्यात आली. त्यांना शिक्षा म्हणून इतर कैद्यांसह सेमेनोव्ह चौकात उभे करून गोळ्या झाडून मारण्याची शिक्षा सुनाविण्यात आली. शिक्षेच्या दिवशी एका अधिकाऱ्याने त्यांचे शिक्षा कमी होण्याचे पत्र आणल्याने दस्तयेवस्की यांना सायबेरियात तुरुंगवासासाठी पाठविण्यात आले. ४ वर्षे कारावास भोगल्यानंतर सायबेरियातच त्यांना सामान्य सैनिक म्हणून काम करण्याची शिक्षा देण्यात आली. तुरूंगातील गलिच्छ वातावरण, तेथील कैदी, सश्रम कारावास हे पाहून दस्तयेवस्की यांचा एक वैचारिक लेखक म्हणून उदय झाला.
साहित्य[संपादन]
१८४५-४६ मध्ये दस्तयेवस्की यांची पहिली कादंबरी पुअर पोक प्रकाशीत झाली. यात दरिद्री कारकुनाच्या मनोविकारांचे वित्रण दस्तयेवस्की यांनी केले आहे. याच वर्षी दस्तयेवस्की यांची दुसरी कादंबरी द डबल प्रकाशीत झाली. यात दोन व्यक्तिमत्त्व असलेल्या एका कारकुनाची गोष्ट आहे. हा नायक अपयशी ठरतो तर त्याचे प्रतिरूप यशस्वी ठरते. शेवटी नायक आपल्यावरील ताणामुळे वेडा होतो. १८६१ साली प्रकाशीत द हाऊस ऑफ द डेड या कादंबरीत दस्तयेवस्की यांनी आपल्या सायबेरियातील अनुभवांबद्दल लिहिले आहे. त्यांच्या क्राईम ॲंड पनिशमेंट (१८६६), द इडियट (१८६८), द पझेस्ड (१८८०), द ब्रदर्स करमाझोव्ह (१८८०) या कादंबऱ्या गाजलेल्या आहेत. आपल्या कादंबऱ्यातून दस्तयेवस्की यांनी लोकांना राष्ट्रवाद शिकविला. लोकांकडून त्यांना खूप प्रेम मिळाले. दस्तयेवस्की यांनी मांडलेली वास्तववाद हा लिओ टॉल्स्टॉय यांच्या वास्तववादापेक्षा वेगळा आहे.