फेरबँक्स आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

फेरबँक्स आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: FAIआप्रविको: PAFAएफ.ए.ए. स्थळसूचक: FAI) अमेरिकेच्या अलास्का राज्यातील फेरबँक्स शहरात असलेला विमानतळ आहे.

येथून अलास्कातील अनेक शहरे वा गावांना तसेच अमेरिकेतील निवडक शहरांना प्रवासी आणि मालवाहतूक सेवा उपलब्ध आहे. याशिवाय उन्हाळ्यात येथून फ्रांकफुर्टला आठवडी सेवा उपलब्ध आहे. फेरबँक्स विमानतळापासून दक्षिण कोरियाला मालवाहतूक सेवा आहे. येथील बव्हंश प्रवासी अलास्का एरलाइन्स आणि डेल्टा एरलाइन्सचा वापर करतात.