Jump to content

फॅट मॅन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फॅट मॅन हा अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी जपानच्या नागासाकी शहरावर टाकलेल्या परमाणुबॉम्बला दिलेले नाव होते.

ऑगस्ट ९, इ.स. १९४५ रोजी बॉक्सकार नावाच्या बी-२९ विमानाने हा टाकल्यावर नागासाकी शहर नष्ट झाले.

याआधी ऑगस्ट ६ रोजी एनोला गे नावाच्या बी-२९ प्रकारच्या विमानाने लिटल बॉय असे नामकरण केलेला परमाणु बॉम्ब हिरोशिमा शहरावर टाकून ते शहर नष्ट केले होते.

युद्धाचा अंत लगेच होणार नाही याची कल्पना आल्याने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमनने नवीनच तयार करण्यात आलेल्या परमाणु बॉम्बचा उपयोग जपानवर करायचे ठरवले. वस्तुतः नोव्हेंबरमध्ये अमेरिकेने जपानवर खुश्कीदलासह हल्ला करण्याचे योजिले होते पण ओकिनावाच्या लढाईनंतर त्यांना कळून चुकले की जपानचा प्रतिकार कडवा असेल व अशा हल्ल्यात जपानइतकीच अमेरिकेचीही हानी होईल. परमाणुबॉम्ब वापरल्यास युद्धांत लगेच होऊ शकेल असा अमेरिकेचा कयास होता. अमेरिकन युद्धसचिवाला देण्यात आलेल्या अंदाजानुसार अशा जमिनीवर केलेलल्या हल्ल्यात १४ ते ४० लाख अमेरिकन सैनिक मरण पावण्याची शक्यता होती. तसेच जपानी नागरिकही लाखांत मेले असते. या अंदाजांबद्दल अद्यापही शंका व्यक्त केली जाते.