फुले साहित्य संमेलन
महाराष्ट्रातील अनेक संस्था फुले साहित्य संमेलन किंवा तत्सम नावाची फुले-आंबेडकर साहित्य संमेलन, फुले-आंबेडकरी विचारधारा परिषद साहित्य संमेलन, सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन, महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन, महात्मा फुले साहित्य संमेलन किंवा फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन अशी संमेलने भरवतात. असेच एक संमेलन ’अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन’ अशा नावाने भरते. २८ नोव्हेंबर २०१४ या दिवशी या नावाचे सातवे संमेलन पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातील खानवडी या महात्मा फुले यांच्या जन्मगावी भरले होते. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सय्यद जब्बार पटेल होते. या संमेलनाची संकल्पना व संयोजन दशरथ यादव यांचीच असून पहिल्या राज्यस्तरीय संमेलनाचे उद्घाटक प्राचार्य शिवाजराव भोसले होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून कवी विठ्ठल वाघ, उपस्थित होते. साहित्य मार्तंड यशवंतराव सावंत, प्रा. मा.म. देशमुख, प्रा. रतनलाल सोनग्रा, बबन पोतदार, श्रीमंत कोकाटे, म.भा. चव्हाण, प्रा गंगाधर बनबरे, डॉ जयप्रकाश घुमटकर, रावसाहेब पवार, डॉ स्वाती शिंदे, हे संमेलनाध्यक्ष म्हणून लाभले आहेत. हे संमेलन दरवर्षी २८ नोव्हेंबरच्या सुमारास घेतले जाते.
या सातव्या संमेलनात फुले यांचा केवळ जयजयकार न करता त्यांच्या विचारांचा अभ्यास व्हावा असे विचार उद्घाटक भाई वैद्य यांनी बोलून दाखविले.
- १० व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक दशरथ यादव होते.
- वारीच्या वाटेवर या ऐतिहासिक महाकादंबरी चे ते लेखक आहेत. यादवकालीन भुलेश्वर, उन्हतला पाऊस, साहित्यिक छत्रपती संभाजीराजे, गुंठामंत्री, मातकट, सुत संस्कृती, पोवाडा पुरुषोत्तमाचा, गाणी शरद पवारांची अशा अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे.होते.
- ११वे संमेलन २७ नोव्हेंबर २०१८ रोजी झाले. संमेलनाच्या अध्यक्षपदी मराठी साहित्यिक शरद मधुकर गोरे होते.
- १२वे महात्मा फुले साहित्य संमेलन, २७ नोव्हेंबर २०१९ रोजी खानवडी येथे झाले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. एस.डी. नाईक संमेलनाध्यक्ष होते.