Jump to content

फुलपाखरू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फुलपाखरु या पानावरून पुनर्निर्देशित)
भारतात सापडणारे ब्लू टाईगर फुलपाखरू

फुलपाखरू हा एक आकर्षक रंगांचा पंख असलेला एक कीटक आहे. कीटकांना डोके, पोट आणि छाती हे अवयव असतात. फुलपाखराला या जोडीने पंख आणि मिशा असतात. फुलपाखरे मिशानी वास घेतात तर पायाने चव ओळखतात.[१] फुलपाखरू वेगवेगळ्या रंगाची, आकाराची ही असतात.

फुलपाखरांचे जीवनचक्र[संपादन]

फुलपाखरांचे आयुष्य हे १४ दिवसांच असते. मोनारक जातीच्या फुलपाखराचे आयुष्य १४ दिवस असू शकते.[१]

फुलपाखरांच्या वाढीच्या अंडी, अळी, कोषफुलपाखरू या अवस्था असतात.

अंडे/अंडी - विशिष्ट जातींची फुलपाखरे ही काही विशिष्ट प्रकारच्या झाडांवर अंडी घालतात. प्रत्येक जातीच्या फुलपाखरांचे होस्ट प्लांट ठरलेले असते. फुलपाखराची मादी ही मिलनानंतर लगेचच तिला हवे असलेले झाड शोधते व त्यावर अंडी घालते. काही फुलपाखरे ही एका वेळी एक अंडे घालतात तर काही समुहाने अंडी घालतात. ही अंडी पानांच्या मागे किंवा पानांच्या बेचक्यात अशी घातलेली असतात. जेणेकरून ती कोणत्याही परिस्थितीत भक्ष्य होऊ नयेत. यांचा रंग पानांशी मिळताजुळता असतो. यांचा आकार खूप लहान म्हणजे अगदी मोहरीच्या दाण्याएव्हढा असतो. फुलपाखराचे रंग वेगवेगळे असतात.

अळी किंवा सुरवंट-अंडे अथवा अंडी घातल्यानंतर त्यातून एका आठवड्याच्या आसपास अळी किंवा सुरवंट त्याच अंड्याचे कवच खाऊन बाहेर पडतो. सुरवंट खूप खादाड असतो. कोवळ्या पानांचा, कळ्यांचा, फुलांचा, कोवळ्याड्याचा फडशा पाडायला तो सुरुवात करतो. परंतु सगळे सुरवंट शाकाहारी नसतात. काही मावा किडीवर तर काही मुंग्यांचे लार्व्हा खातात.ही अवस्था साधारण १५ ते २० दिवस असते. सुरवंटाचा आकार मोठा होतो. या अवस्थेत तो ३ ते ४ वेळा वरचे आवरण काढून टाकतो. यांचेही रंग आसपासच्या वातावरणातील रंगांशी मिळतेजुळते असतात. काही मांसल तर काही केसाळ असतात.

कोष - अळीची वाढ पूर्ण झाली की ती एखादी सुरक्षित जागा शोधते आणि त्या जागी स्थिर होते. कोष करताना ती तिची त्वचा, पाय आणि मुख हे अवयव गळून पडतात. त्यानंतर अळी स्वतःभोवती कोष तयार करते. काही कोष झाडांवर तर काही जमिनीच्या आत असतात. कोषामध्ये राहण्याचा काळ हा सहा दिवस ते काही महिने असा असू शकतो. हा काळ सभोवतालच्या वातावरणावर अवलंबून असतो.

फुलपाखरू कोषात असतानाच अळीचे रूपांतर फुलपाखरात होऊ लागते. पूर्ण वाढ झाली आणि अनुकूल वातावरण मिळाले की फुलपाखरू त्या कोषाला भेग पाडून बाहेर येते. बाहेर आल्यानंतर त्याचे पंख ओलसर आणि दुमडलेले असतात. तास ते दीड तासात त्या पंखांची हालचाल सुरू होते. यामुळे पंख कोरडे होण्याची आणि ते सरळ करण्याची प्रक्रिया पूर्ण होते. यानंतर पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू आपली झेप घेऊन जीवनास सिद्ध होते.

जाती[संपादन]

बिबळ्या कडवा[संपादन]

बिबळ्या कडवा या जातीच्या फुलपाखपाराची मादी रुईच्या पानांवर अंडी घालते. अंड्यामधून सहा ते आठ दिवसांनी अळी बाहेर पडते. या अळीलाच सुरवंट म्हणतात. या फुलपाखराचा सुरवंट अंड्यातून बाहेर पडतेवेळी भुकेने वखवखलेला असतो. मोनार्क जातीची फुलपाखरे लांब प्रवासासाठी प्रसिद्ध आहेत.

चित्रदालन[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b Kalman, Bobbie (2002). The Life Cycle of a Butterfly (इंग्रजी भाषेत). Crabtree Publishing Company. ISBN 9780778706502.