फिलिप ह्यूज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फिलिप ह्यूज

फिलिप जोएल ह्यूज , लेखनभेद - फिल ह्युजेस - (जन्म : ३० नोव्हेंबर १९८८, मॅक्सव्हिल, न्यू साउथ वेल्स - २७ नोव्हेंबर २०१४, सिडनी) हा एक ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू होता. डाव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या ह्यूजने ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाकडून खेळताना २६ कसोटी सामन्यांमध्ये १,५३५ धावा तर २५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ८२६ धावा काढल्या होत्या.

२५ नोव्हेंबर २०१४ रोजी सिडनी क्रिकेट मैदानावर प्रथम श्रेणी क्रिकेटच्या एका सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना ह्यूजला एक उसळी घेणारा चेडू मानेवर लागला. ह्या दुखापतीमुळे मणका व मेंदूला तीव्र जखम होऊन दोन दिवसांनी २७ नोव्हेंबर रोजी ह्यूजचे हॉस्पिटलमध्येच निधन झाले.

मैदानावर चेंडू लागून जखमी किंवा मृत झालेल्या अन्य खेळाडूंसाठी पहा सयाजीराव धनवडे.

बाह्य दुवे[संपादन]