Jump to content

फागु पुन्ही

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फागु पुन्ही हा नेपाळ मध्ये साजरा केला जाणारा होळी सण आहे.[][]

स्वरूप

[संपादन]
नेपाळ मधील होळी

एकमेकांवर रंग आणि पाणी उडवून सणाचा आनंद घेणे असे याचे स्वरूप आहे. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या आधी आठ दिवस नेपाळमध्ये या सणाची सुरुवात होते.[] काठमांडू येथील प्रसिद्ध चौकात चीर उभारले जाते. यामध्ये बांबूपासून एक आकृती तयार करतात आणी त्यावर रंगीत कपड्यांचे आच्छादन घालतात.[]होळीच्या दिवशी संध्याकाळी हे वस्त्र खाली ओढले जाते आणि पेटविले जाते. याला चीर हरण किंवा होलिका दहन असे म्हणले जाते.[] या सणाच्या निमित्ताने भगवान कृष्ण आणि भगवान शिव यांना गुलालाने स्नान घातले जाते. हंगामातील पहिला आंबा आणि चणे यांचा देवतांना नैवेद्य दाखविला जातो आणि त्यानंतर आंबा खायला सुरुवात केली जाते.[] हिरण्यकश्यपू याने आपला मुलगा प्रह्लाद याला विष्णूची पूजा करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण तरीही प्रह्लाद वडिलांचे ऐकेना. त्यावळी प्रह्लादाला होलिका या राक्षसिणीच्या मांडीवर बसवून जाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण विष्णू कृपेने प्रह्लाद वाचला आणि होलिका स्वतः जळून गेली अशी आख्यायिका येथे प्रचलित आहे.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Xing, Jun; Ng, Pak-sheung (2015-10-23). Indigenous Culture, Education and Globalization: Critical Perspectives from Asia (इंग्रजी भाषेत). Springer. ISBN 978-3-662-48159-2.
  2. ^ "Holi 2023 : फक्त पाण्यानेच नाही तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने साजरी होते होळी l Holi 2023 Unknown Facts india nepal". eSakal - Marathi Newspaper. 2023-03-23 रोजी पाहिले.
  3. ^ "तराई : होली न्यायेकूसें | नेवा: अनलाइन न्युज". www.newaonlinenews.com (इंग्रजी भाषेत). 2023-03-23 रोजी पाहिले.
  4. ^ "Holi 2022 : भारतासोबतच 'या' देशांमध्येही उत्साहाने साजरी केली जाते होळी! जाणून घ्या पद्धत". Loksatta. 2023-03-23 रोजी पाहिले.
  5. ^ "Falgu Purnima, Holi, Falgu purnima in Nepal, Falgu Purnima 2078, Falgu Purnima 2021, Holika Dahan, Holi 2078, Holi 2021, Holi dates, Falgu Purnima Dates". calendar-nepali.com. 2023-03-14 रोजी पाहिले.
  6. ^ Behera, Jyoshnarani (1997). Political Socialization of Women: A Study of Teenager Girls (इंग्रजी भाषेत). Atlantic Publishers & Dist. ISBN 978-81-85495-21-7.
  7. ^ Pranjal (2015-02-19). Travel and Tourism of Nepal (इंग्रजी भाषेत). AuthorHouse. ISBN 978-1-4969-8268-1.