सुरेखा यादव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सुरेखा यादव मध्य रेल्वेच्या मुंबईमधील उपनगरी सेवेतील पहिल्या महिला मोटर चालक आहेत. इंजिन ड्रायव्हर, लोको पायलट, असिस्टंट ड्रायव्हर अशा अनेक हुद्यांवर काम करणाऱ्या सुरेखा यादव यांची अनेक वर्षांच्या अथक मेहनतीनंतर मोटरचालक म्हणून निवड झाली.


मध्य रेल्वेच्या मुंबईतील मेन लाईनवर तसेच हार्बर लाईनवर सुरेखा यादव या लोकल चालवतात.

त्यांनी सर्वप्रथम १९८८ मध्ये रेल्वेची पहिली महिला स्पेशल गाडी चालविली व त्यानंतर ८ मार्च २०११ मध्ये डेक्कन क्वीन ही पुणे ते मुंबई गाडी चालविली. हा मार्ग रेल्वेचा कठीण मार्ग समजल्या जातो. त्या आशिया खंडातील प्रथम महिला रेल्वेचालक आहेत. त्यांना नुकतेच भारत सरकारतर्फे फर्स्ट लेडी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

बाह्य दुवे[संपादन]