फर्मी गॅमा किरण अंतराळ दुर्बीण
फर्मी गॅमा किरण अंतराळ दुर्बीण Fermi Gamma-ray Space Telescope | |
---|---|
साधारण माहिती | |
इतर नावे | गॅमा-रे लार्ज एरिया स्पेस टेलिस्कोप |
एनएसएसडीसी क्रमांक | २००८-०२९ए |
संस्था | नासा · यू.एस. ऊर्जा विभाग |
मुख्य कंत्राटदार | जनरल डायनामिक्स[१] |
सोडण्याची तारीख | ११ जून, २००८ |
कुठुन सोडली | केप कॅनावेरल, अमेरिका |
सोडण्याचे वाहन | डेल्टा २ ७९२०-एच |
प्रकल्प कालावधी | नियोजित: ५-१० वर्षे पश्चात: १६ वर्षे, १९६ दिवस |
कक्षेचा प्रकार | भूकेंद्रीय कक्षा |
कक्षेची उंची | अर्धदीर्घ अक्ष: ६,९१२.९ किमी (४,२९५.५ मैल) उत्केंद्रता: ०.००१२८२ अपसूर्य बिंदू: ५२५.९ किमी (३२६.८ मैल) उपसूर्य बिंदू: ५४३.६ किमी (३३७.८ मैल) कल: २५.५८ अंश |
कक्षेचा कालावधी | ९५.३३ मिनिटे |
फिरण्याचा वेग | ७.५९ किमी/से |
तरंगलांबी | ८ keV - ३०० GeV पेक्षा जास्त[२] |
उपकरणे | |
GBM | Gamma-ray Burst Monitor |
LAT | Large Area Telescope |
संकेतस्थळ fermi |
फर्मी गॅमा किरण अंतराळ दुर्बीण ही गॅमा किरणांमध्ये खगोलीय स्रोतांचा वेध घेणारी अंतराळ वेधशाळा आहे. फर्मीला ११ जून २००८ रोजी नासाच्या डेल्टा २ या रॉकेटमधून अंतराळात प्रक्षेपित करण्यात आले. नासा, यू.एस. ऊर्जा विभाग त्याचबरोबर फ्रान्स, जर्मनी, जपान, इटली आणि स्वीडन या देशातील सरकारी संस्थांच्या सहयोगाने या वेधशाळेची निर्मिती करण्यात आली.[३]
यातील लार्ज एरिया टेलिस्कोप हे मुख्य उपकरण आहे. खगोलशास्त्रज्ञ याचा वापर मुख्यत: संपूर्ण आकाशाचा गॅमा किरणांमध्ये सर्व्हे करून सक्रिय दीर्घिकीय केंद्रक, पल्सार व इतर उच्च ऊर्जेचे स्रोत आणि कृष्णद्रव्य यांच्या अभ्यासासाठी करतात. यातील गॅमा-रे बर्स्ट मॉनिटर या दुसऱ्या उपकरणाचा गॅमा किरण स्फोटांचा अभ्यास करण्यासाठी वापर केला जातो.[४]
फर्मीपासून मिळणारा डेटा सर्वांसाठी खुला असून तो फर्मी सायन्स सपोर्ट सेलच्या संकेतस्थळावरून मिळवता येऊ शकतो. डेटाचे विश्लेषण करण्यासाठी लागणारे सॉफ्टवेअरसुद्धा सर्वांसाठी उपलब्ध आहे.
संदर्भ
[संपादन]- ^ "GLAST Science Writer's Guide" (PDF) (इंग्रजी भाषेत). 2016-11-08 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 23 February 2016 रोजी पाहिले.
- ^ "NASA - Fermi Spacecraft and Instruments" (इंग्रजी भाषेत). 2011-03-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-08-10 रोजी पाहिले.
- ^ "An Astro-Particle Physics Partnership Exploring the High Energy Universe - List of funders" (इंग्रजी भाषेत). 9 August 2007 रोजी पाहिले.
- ^ "NASA's GLAST Burst Monitor Team Hard at Work Fine-Tuning Instrument and Operations" (इंग्रजी भाषेत). 2019-05-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-08-10 रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |