प्राजक्ता गायकवाड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्वराज्यरक्षक संभाजी या झी मराठी वाहिनीवरील ऐतिहासिक मालिकेत महाराणी येसू

प्राजक्ता गायकवाड
नागरिकत्व भारतीय

बाई यांचे कणखर आणि निर्भिड पात्र प्राजक्ता गायकवाड यांनी सशक्तपणे साकारले आहे. या मालिकेला फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभरातील शिवप्रेमींनी भरघोस प्रतिसाद दिला. स्वराज्याचं धाकलं धनी ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनासोबतच महाराणी येसूबाई यांच्या आयुष्यावर पहिल्यांदाच माहिती लोकांपर्यंत पोहोचली आहे. या मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका साकारणाऱ्या प्राजक्ता गायकवाड हिचे देखील भरभरून कौतुक होत होते. करिअरच्या सुरुवातीलाच त्यांच्या अभिनयाची छाप पडली असून त्यांचा चाहता वर्ग देखील निर्माण झाला आहे. त्यांनी नांदा सौख्य भरे या मालिकेतही महत्त्वाची भूमिका साकारली असून संत तुकाराम मालिकेतील संत बहिणाबाईचे पात्र देखील सशक्त रितीने रंगविले आहे. स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेनंतर आई माझी काळुबाई या मालिकेतही त्या झळकल्या आहेत.