Jump to content

प्रशांती सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Padma Shri Prashanti Singh
Padma Shri Prashanti Singh

प्रशांती सिंग हिचा जन्म ५ मे १९८४ मध्ये वाराणसी , उत्तर प्रदेश येथे झाला.ती भारतीय महिला बास्केटबॉल संघाची शुटिंग गार्ड आहे.२०१७ मध्ये भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाने तिला अर्जुन पुरस्काराने गौरविले आहे.[] भारताने तिला दिलेला बास्केटबॉलमधील प्रथम महिला खेळाडू असून तिला  राष्ट्रीय नागरी पुरस्कार पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.[]

कारकीर्द

[संपादन]

प्रशांती २००२ मध्ये भारतीय महिला बास्केटबॉल संघात रुजू झाली आणि लवकरच त्याची कर्णधार झाली.[] प्रशांती सिंग ही भारतातील बास्केटबॉलमधील सर्वात आकर्षक महिला आहे.तीची बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया आणि आयएमजी-रिलायन्स यांच्याकडून निवड करण्यात आली.भारताच्या पहिल्या चार 'अ' श्रेणीतील खेळाडूंपैकी ती एक खेळाडू आहे.

प्रशांती सिंगने राष्ट्रीय चॅंपियनशिप, राष्ट्रीय खेळ आणि फेडरेशन कपमध्ये २३ पदके जिंकली आहेत.[]

संदर्भ यादी

[संपादन]
  1. ^ "अर्जुन पुरस्कार पाकर बोलीं प्रशांति, बनारस की मिट्टी और प्रेम से मिला यह मुकाम". Amar Ujala. 2019-11-08 रोजी पाहिले.
  2. ^ "बनारस की बेटी प्रशांति को अर्जुन अवार्ड, यूपी से पहली महिला बास्केटबॉल प्लेयर को यह सन्मान". Amar Ujala. 2019-11-08 रोजी पाहिले.
  3. ^ "Women basketball players should get more job opportunities: Prashanti Singh". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2019-11-08 रोजी पाहिले.
  4. ^ "Delhi post third win on the trot. - Free Online Library". www.thefreelibrary.com. 2019-11-11 रोजी पाहिले.