पोल पोट
Appearance
पोल पोट | |
कांपुचेयाचा पंतप्रधान
| |
कार्यकाळ १७ एप्रिल १९७५ – ७ जानेवारी १९७९ | |
जन्म | १९ मे १९२५ |
---|---|
मृत्यू | १५ एप्रिल, १९९८ (वय ७२) |
धर्म | निधर्मी |
सालोथ सार उर्फ पोल पोट (ख्मेर: ប៉ុល ពត; १९ मे १९२५ - १५ एप्रिल १९९८) हा कंबोडियामधील एक कम्युनिस्ट व ख्मेर रूज ह्या संघटनेचा म्होरक्या होता. एप्रिल १९७५ ते जानेवारी १९७९ दरम्यान तो कंबोडियाचा राष्ट्रप्रमुख होता. पोल पोट हा एक क्रुर हुकूमशहा होता ज्याने कंबोडियामध्ये संपूर्ण कृषीप्रधान साम्यवाद अंगिकार करण्याचा घाट घातला होता. त्याच्या ४ वर्षांच्या कारकिर्दीत कंबोडियामधील २५ टक्के जनता मृत्यूमुखी पडली व सर्वच बाबतीत देशाची अतोनात हानी झाली.त्याने कंबोडियामध्ये त्याला विरोध करणाऱ्या विद्वानांची सामूहिक हत्याकांडे घडवून आणली.
१९७९ साली व्हियेतनामने केलेल्या लष्करी हल्ल्यामध्ये ख्मेर रूजची कंबोडियावरील सत्ता संपुष्टात आली व पोल पोटने जंगलाकडे पलायन केले.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत